चालत्या बसचा जॉइंट तुटल्याने राहुरीत बस दुर्घटना होता होता टळली
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी बस स्थानकात आज सकाळीच श्रीरामपुरला जाणाऱ्या एसटी बसचा जॉईन्ट तुटल्याने बस जागेवरच उतारावरून मागे सरकली , सुदैवाने दुर्घटना टळली .
राहुरी बसस्थानकाचे सध्या काम मंद गतीने सूरु असून नगर मनमाड हायवेच्या डांबरीकरणामुळे बसस्थानकातून बाहेर जाणाऱ्या गाड्यांना साडेतीन ते चार फूट चढावरून ये जा करावी लागते .
त्यातच जुन्या झालेल्या बसेस ना अडचणी येतात .
आज सकाळी श्रीरामपूर डेपोची एसटी बस बसस्थानकातून निघताच याच बसस्थानकाच्या चढावर बसचा जॉइंट तुटला .
बस पुढे जाण्याऐवजी मागे सरकली . बस स्थानकावर काम चालू असल्याने कडेच्या खडीवर ती थांबली .सुदैवाने दुर्घटना टळली .
बस मधून प्रवासी बाहेर पडले . ही बस जुनी असल्याने हा प्रकार घडला असावा , अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती .
बसस्थानकाचे काम सध्या मंद गतीने होत आहे . त्यामुळे बसचालकांसह प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . एसटी महामंडळाने अनेक नवीन बसेस सुरू केले आहेत . शिवाई , शिवशाही , लालपरी , हायड्रोजन वर चालणारी बस मात्र जुन्या बसेस तशाच सुरू असल्याने एसटी महामंडळ एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहे काय ? असा संतप्त सवाल आज प्रवासी व्यक्त करत होते . श्रीराममपूर बस डेपो मध्ये देखील अनेक जुन्या बसेस असून त्या बंद करून नवीन बसेस सुरू करण्याची मागणी होत आहे .



Post a Comment
0 Comments