देवळाली प्रवराचे प्राचार्य कडूस सर यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ संपन्न
देवळाली प्रवरा ( जालिंदर मुसमाडे )
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा प्राचार्य श्री कडुस पोपट दादाभाऊ यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न झाला .
कार्यक्रमास कडू सरांचा सत्कार करताना माननीय एडवोकेट विश्वासरावजी आठरे साहेव सचिव अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज तसेच रामचंद्र दरे साहेब अध्यक्ष जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहिल्यानगर , नगराध्यक्ष सत्यजित कदम ,जयंत वाघ साहेब ,खानदेशी साहेब, मुळे साहेब ,दीपक दरे साहेब, यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र दरे साहेब होते. भाषणे सौ प्रभावती कडूस मॅडम ,आप्पासाहेब शिंदे ,दत्तात्रय कडू दीपक दरे साहेब ,जयंत वाघ साहेब ,रामचंद्र दरे साहेब यांचे भाषण झाले.
भाषणात सौ प्रभावती मॅडम म्हणाल्या , आम्ही वेळेला महत्व देतो आमचे कुटुंब शिस्तीला फार महत्त्व देतात सरांनी महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थी घडवले . शैक्षणिक जबाबदारी प्रामाणिक पार पाडली आहे .
दीपक दरे साहेब म्हणाले , शाळेला शिस्तबद्ध असे सर मिळाले तर शाळा व्यवस्थित चालते . त्यांनी ठीक ठिकाणी कामाचा ठसा उमटवला आहे .
रामचंद्र दरे साहेब म्हणाले, माझ्या मते शिक्षक हा कर्मचारी नाही हा कर्मयोगी आहे . ही संस्था ही आम्हाला कडूस सरांचे फार महत्वाची योगदान मिळाले आहे.
सत्कारास कडूस सर उत्तर देताना म्हणाले , माझी 32 वर्षे सेवा झाली आहे . मी शाळेसाठी पूर्ण वेळ दिला आहे . माझी मुले नोकरीस आहेत , मी देवळाली प्रवरा शाळेत 2008 पासून रुजू झालेलो आहे . शिस्तबद्ध मध्ये मी कधीच तडजोड करीत नाही , केली नाही . वेळेला मी फार महत्व देत असतो . मला देवळाली प्रवरा करांनी खूप खूप साथ दिली आहे . देवळाली प्रवारासारखे गाव मला शांत प्रिय शिस्तबद्ध लाभले आहे . मी कधीही शाळेला विसरणार नाही. मी सर्वांचे आभार मानतो माझा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद आभार. या कार्यक्रम प्रसंगी उपाध्यक्ष सौ. बेबीताई बर्डे माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम. नगरसेवक अजित चव्हाण .बाबासाहेब चव्हाण सर.दत्तात्रय कडू.शिवाजी कदम.मच्छिंद्र पाटील कदम.भालेकर सर. शालेय समिती अध्यक्ष महेश गडाख. पालक शिक्षक संघ अध्यक्ष नानासाहेब उंडे. शिवराम कडू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय समिती अध्यक्ष जालिंदर मुसमाडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे परिश्रम श्री शिंदे सर उप मुख्याध्यापक श्री डोफे सर पर्यवेक्षक श्रीमती शिंदे मॅडम समन्वयक श्रीमती कदम मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद.यांनी घेतले आहे.कार्यक्रमाचे आभार ढोकणे सर यांनी केले...


Post a Comment
0 Comments