Type Here to Get Search Results !

अबब..... राहुरीचा पारा चार दिवसात साडेपाच अंशाने वाढला !उन्हाच्या झळा वाढल्या ; काळजी घ्या

 अबब..... राहुरीचा पारा चार दिवसात साडेपाच अंशाने वाढला !उन्हाच्या झळा वाढल्या ; काळजी घ्या



राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरीचा पारा चार दिवसात साडेपाच अंशाने वाढला असून राहुरीकरांना उन्हाच्या चांगल्या झळा बसत आहेत .

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .

          गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र वातावरणातील बदलामुळे उन्हाच्या झळा वाढल्या असल्याचे चित्र आहे . राहुरीत 10 एप्रिल ला 35 अंश इतके कमाल तापमान होते तर किमान 16 अंश तापमान होते . आज दिनांक 15 एप्रिल रोजी तापमानात आणखी वाढ होत 41.4 इतक्या तापमान उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून किमान तापमानातही चांगलीच वाढ होत 18 अंश इतके तापमान आहे . त्याचा जनजीवनावर चांगलाच परिणाम दिसून येत असून नागरिकांनी विशेषतः महिला , लहान मुलांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे .

Post a Comment

0 Comments