Type Here to Get Search Results !

17 जागांसाठी 18 जूनला होणार मतदान ; विधानपरिषद निवडणुकांचा वाजला बिगुल

 17 जागांसाठी 18 जूनला होणार मतदान ; विधानपरिषद निवडणुकांचा वाजला बिगुल 




सतर्क ( विशेष वृत्त )

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे . भारतीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १८ जूनला मतदान होणार असून, २२ जूनला मतमोजणी होणार आहे .


राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या १६ जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी येत्या १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून, २२ जून २०२६ रोजी मतमोजणी पार पडेल. 

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण 17 जागांवर निवडणूक होणार, ज्यातील एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघासाठी देखील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.


निवडणुकीची अधिसूचना- 25 मे 

अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 1 जून 

उमेदवारी अर्जाची छाननी - 2 जून 

अर्ज माघारीची मुदत - 4 जून 

मतदान - 18 जून (स.8 ते दु.4) 

मतमोजणी - 22 जून

दरम्यान , अहिल्यानगर येथील स्वर्गीय अरुण काका जगताप यांचीही जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी ही निवडणूक होणार असून येत्या काही दिवसात अहिल्यानगरचे चित्र स्पष्ट होणार आहे .

Post a Comment

0 Comments