वडिलांच्या मताधिक्याचाही केला विक्रम राहुरीचे आमदार अक्षय दादा कर्डिले यांनी
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या बहुमताचा आकडा यांचे चिरंजीव अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी आज विक्रमी मतांनी विजयी होत पार केला .
[ विनम्र अभिवादन ]
दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली . आज झालेल्या मतमोजणी अखेर भाजपा उमेदवार अक्षय कर्डिले हे यांना
एक लाख 38 हजार 929 हजार इतकी मते मिळवत एक लाख दहा हजाराहून अधिक इतक्या मतांनी आघाडी घेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे .
भाजपा उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या समोरील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांना कमी मते मिळाली . याशिवाय एका मोठ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी व अपक्ष उमेदवार यांनाही कमी मते मिळाली . अन्य अपक्ष उमेदवारांना अत्यल्प मते मिळाली आहेत .
अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवडणुकीच्या स्पर्धेत असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना विनंती करत निवडणुकीतून माघार घेण्याचे प्रयत्न यशस्वी झाले . त्यामुळे ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सोपी झाली , असे मानले जाते .
दरम्यान , विजयी उमेदवार अक्षय कर्डिले यांनी विजयानंतर हा विजय आपण आपले वडील व सर्व सामान्यांचे हित जोपासणारे कैलासवासी शिवाजीराव कर्डिले यांना समर्पित करीत असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केली .



Post a Comment
0 Comments