Type Here to Get Search Results !

हे पहा... राज्यातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा ; आपल्या धरणात किती आहे पाणी शिल्लक

हे पहा... राज्यातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा ; आपल्या धरणात किती आहे पाणी शिल्लक



राज्यातील प्रमुख धरणांमध्ये 15 मे 2026 रोजी सुमारे 34.10% इतका उपयुक्त पाणीसाठा-- इंजि.हरिश्चंद्र चकोर

अहिल्यानगर ( वार्ताहर )

*राज्यात सद्यस्थितीत पाणी संचय करण्यात येणाऱ्या लहान, मध्यम व मोठे एकूण एकत्रित सुमारे 3028 इतकी धरणे असून यावर्षीच्या15 मे 2026 अखेर या सर्व धरणांमध्ये सुमारे 34.10%टक्के( 491.855 टी.एम.सी. )इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपत्ती अभ्यासक व जल सिंचन तज्ञ इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.*



*त्याचबरोबर गतवर्षी दि15 मे 2025 रोजी राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा हा फक्त 29.20% म्हणजेच 421.177 टी.एम.सी. इतकाच होता, मात्र यावर्षी सुमारे 4.90%टक्के(70.678 टी.एम.सी.) इतका उपयुक्त पाणीसाठा अधिक(ज्यादा )आहे*.

*पुढे बोलताना श्री चकोर यांनी सांगितले की, राज्यात सहा(6) महसुली विभाग असून 15 मे 2026 रोजी उपयुक्त पाणी साठ्या ची स्थिती खालील प्रमाणे आहे* 

*♦️कोकण विभागात एकूण 173 धरणे असून त्यांमध्ये आजमीतीस सुमारे 49.801 टी.एम.सी.( 38.06%) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे*. 

*♦️नाशिक विभागात 539 इतकी लहान,मध्यम व मोठी धरणे असून त्यामध्ये आजमितीस 73.704*

 *टीएमसी (35.04%) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे*.

 *♦️पुणे विभागात एकूण 724 धरणे असून त्यामध्ये आज 137.687 टीएमसी (25.56%) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.* 

*♦️मराठवाडा विभागामध्ये एकूण 929 धरणे असून त्यामध्ये आज सुमारे 100.536 टी.एम.सी. (39.07)% इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे* .

*♦️अमरावती विभागामध्ये 276 धरणे असून त्यामध्ये 61.465 टी.एम.सी. ( 44.33%) आणि* 

*♦️नागपूर विभागात 387 धरणे असून या धरणांमध्ये 68.663 टी.एम.सी. (41.20%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे*. 

*♦️सर्वात जास्त पाणीसाठा हा अमरावती विभागात (44.33%) आणि त्या खालोखाल मराठवाडा विभागात (39.07%) असून सर्वात कमी पाणीसाठा पुणे विभागात (25.56%)असल्याचे दिसून येत आहे*.              

*महत्त्वाचे म्हणजे राज्यातील प्रमुख मोठ्या तीन(3 ) धरणांमध्ये दि.15 मे 2026 रोजी शिल्लक असलेला उपयुक्त(Live) पाणीसाठा खालील प्रमाणे आहे* .                                 

*१)उजनी धरण--(उणे-)6.08 टी.एम.सी.(उणे-)*11.35%*) *२) कोयना ---19.048 टी.एम.सी.( 19.02%). ३)जायकवाडी ---32.84 टी.एम.सी. (42.86%)*                                                                                                                       

*तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात प्रमुख ल असलेल्या जवळपास 13 प्रकल्पांमध्ये मध्ये एकूण(Total )पाणीसाठा अंदाजे 21.90 टी.एम.सी इतका असून गतवर्षीपेक्षा तो 4.00 टीएमसी इतका अधिक +आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या १)भंडारदरा धरणात एकुण सुमारें 3899दलघफु (35.32%)*

*२)निळवंडे धरणात-- 2661 दलघफु.(31.98%)**

*३)मुळा धरणात--11420 दलघफु (43.92%)*,

 *४)आढळा धरण--516 दलघफु.(48.68%)*

*५)सीना--1095 दलघफु.(45.63%)*

*६)घोड---1332 दलघफु**(*22.28%)*

*७)भोजापुर-+11 द.ल.घ.फुट उपयुक्त (3.05%)*

 *इतका पाणीसाठा शिल्लक असल्याची. अशी माहिती इंजि हरिश्चंद्र. र. चकोर यांनी दिली.*

*♦️या वर्षी चा रब्बी हंगाम संपलेला असून उन्हाळी हंगाम सुरू आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या उपयुक्त पाण्यासाठा लक्षात घेता उन्हाळ्यात देखील शेती सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग होऊ शकतो व त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या देखील फारसी भेडसावणार नाही, मात्र उन्हाळ्याचा कालावधी लक्षात घेता व वाढत जाणारे तापमान इत्यादीमुळे बाष्पीभवन व्यय (Evaporation losses)जास्त संभवतो व तसेच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण सरासरी आकडेवारीपेक्षा कमी राहणार असल्याने दि.31 ऑगस्ट 2026 अखेरपर्यंत पिण्याचे पाणी पुरविणे चे दृष्टीने देखील प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक असल्याने राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पिण्याचे पाणी आरक्षण सुनिश्चित करण्याचे दृष्टीने संबंधित विभागांना आदेश दिलेले आहेत, त्यानुसार शासन,प्रशासन व जलसंपदा विभागाने तशी तयारी देखील केली आहे.*

*यावर्षी महाराष्ट्रात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस येण्याची शक्यता आहे.*

*♦️ या वर्षी पुणे शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खडकवासला धरणसमुहाचा उपयुक्त पाणीसाठा सुमारे 8.28 टी.एम.सी. (28.39%) टक्के इतका असून गतवर्षीच्या उपयुक्त पाणी साठ्यापेक्षा तो अंदाजे(1.30 टीएमसी) 4.00% टक्क्यांनी अधिक आहे.*

♦️*नाशिक जिल्ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा सुमारे 32.32% इतका असून गतवर्षीपेक्षा तो 6.26% टक्के जास्त+ आहे*व तसेच नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सुमारे 2.468 टीएमसी (43.84%)व दारणा धरणात सुमारे 1.775 टीएमसी (28.83%) कडवा धरणात 0.418 टी.एम.सी. (24.76%) इतका उपयुक्त पाण्यासाठा शिल्लक आहे.*

♦️*महत्त्वाचे म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागासाठी(मराठवाडा)व अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागासाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी प्रकल्पातील बाष्पीभवनाचे प्रमाण दररोज अंदाजे 80 द.ल.घ.फु. इतके नोंदवले जात असून या पुढील कालावधीमध्ये बाष्पीभवनव्ययाचे प्रमाण अधिक वाढू शकते. त्यानुसार दर महिन्याला अंदाजे 2.500 टी.एम.सी. इतका बाष्पीभवन व्यय ( Evaporation losses) होऊ शकतो. विशेष म्हणजे 01जुलै 2025 ते 15 मे 2026 अखेर पर्यंत जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यामधुन अंदाजे 11.58 टी.एम.सी.(11.27%) इतका बाष्पीभवन व्यय (Evaporation losses) झालेला दिसून येत आहे.त्यामुळे यापुढील कालावधीत म्हणजे साधारणत: 31 ऑगस्ट 2026 अखेर पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे फार गरजेचे ठरणार असल्याचे देखील श्री चकोर यांनी सांगितले*.*

*♦️ महत्त्वाचे म्हणजे तदनुषंगाने राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पिण्याचे पाणी आरक्षण सुनिश्चित करण्याचे दृष्टीने संबंधित विभागांना आदेश दिलेले आहेत.*

*राज्यातील काही महत्त्वाच्या धरणांमधील उपयुक्त(लाईव्ह) पाणी साठे खालील प्रमाणे आहेत* 

*♦️कोकण विभाग* 

*सुर्या धरण --3.152 टीएमसी (32.30%)*

*मध्य वैतरणा --1.938 टीएमसी (28.36%)*

*डोलवहाळ धरण --0.218 टीएमसी (94.92%)*

*भातसा धरण --13.317 टीएमसी*(*40.03%)*

*बारावी धरण --4.199 टीएमसी (35.09%)*

*मोडकसागर --3.151 टीएमसी (51.05%)*

*तानसा --1.938 टीएमसी (31.81%)*

*तिलारी --5.472 टीएमसी (34.64%)*

======================

*♦️नागपूर विभाग*

*गोसी खुर्द--11.182* *टीएमसी (42.78%)*

*पेंच प्रकल्प --18.543 टीएमसी (51.64%)*

*असोलामेंढा--1.155 टीएमसी (62.53%)*

*दिना धरण ---1.282 टीएमसी (53.75%)*

*इटियाडोह--2.852 टीएमसी (25.80%)*

*निम्न वर्धा ---3.783 टीएमसी (49.39%)*

*काटेपुर्णा--0.786 टीएमसी (25.78%)*

*उर्ध्व वर्धा --9.5720 टीएमसी (48.05%)*

*खडकपुर्णा--0.00%*

*अरुणावती---2.510 टीएमसी (41.89%)*

=====================

*♦️नाशिक विभाग (जळगाव जिल्हा)*

*गिरणा धरण --7.52 टीएमसी (47.66%)*

*हतनूर धरण --2.945 टीएमसी (32.71%)*

*वाघुर धरण ---6.181 टीएमसी (70.52%)*

*मध्य वैतरणा--6.00 टीएमसी (51.25%)*

=====================

*♦️मराठवाडा (छ.संभाजीनगर विभाग)*

*माजलगाव ---4.608 टीएमसी (41.92%)*

*मांजरा धरण --2.332 टीएमसी (37.37%)*

*येलदरी ---16.108 टीएमसी (56.33%)*

*विष्णुपुरी -- 1.650 टीएमसी (57.84%)*

*निम्न तेरणा ---2.345 टीएमसी (72.79%)*

*सीना कोळेगाव--0.064 टीएमसी (2.39%)*

*शिवनी---0.416 टीएमसी (12.08%)*

*निम्न दुधना --3.515 टीएमसी (36.85%)*

=====================

♦️*पुणे विभाग*

*खडकवासला --- 1.093 टीएमसी (55.36%)*

*पानशेत ---3.757 टीएमसी (35.27%)*

*डिंभे --2.287 टीएमसी (18.31%)*

*चासकमान ---1.250 टीएमसी (16.51%)*

*भाटघर ---3.254 टीएमसी (13.85%)*

*वारणा ---9.076 टीएमसी ( 32.98%)*

*धोम ---3.039 टीएमसी (26.00%)*

*वीर----5.198 टीएमसी (55.26%)*

*दुधगंगा ---3.220 टीएमसी (13.42%)*

*राधानगरी ----2.765 टीएमसी (35.60%)*

*तुळशी ---1.534 टीएमसी (47.27%)*

================ *♦️राज्यातील तीन (३) प्रमुख मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणी साठी खालील प्रमाणे* 

*१) जायकवाडी-- 32.859 टीएमसी/ (42.86%)*

*२) कोयना ---19.048 टीएमसी /(19.02%)*

*३) उजनी---(-)6.080 मृतसाठा टीएमसी)/(-)11.35%)*

*जायकवाडी धरणातील पाणीसाठा गेल्या पंधरा दिवसात अंदाजे चार(3.86 टीएमसी) टीएमसीने कमी झाला असून देखील तो गतवर्षीपेक्षा 10% जास्त आहे ही जमेची बाजू आहे.*

*गतवर्षी मात्र साधारणतः मे महिन्याच्या च्या नऊ-दहा तारखे पासूनच अवकाळी/ बिगर मोसमी पावसाला सुरुवात झाली होती. तथापि यावर्षी अद्याप पाऊस सुरू होण्याची चिन्हे दिसून येत नसून साधारणतः जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाळी पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे*. *

*बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजेच सन 2015-16 सालामध्ये देखील पावसाने दडी मारली होती आणि पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती या बाबीचा अनुभवमी लक्षात घेऊन प्रशासनाने मात्र याबाबतची तयारी केली असल्याचे समजते*.

Post a Comment

0 Comments