Type Here to Get Search Results !

तनपुरें यांच्या या भावनिक पोस्टची समर्थकांसह सर्वत्र होत आहे चर्चा

 तनपुरें यांच्या या भावनिक पोस्टची समर्थकांसह सर्वत्र होत आहे चर्चा



सतर्क  ( विशेष वृत्त )



गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत राहिले आहे . आज प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली



आहे . या पोस्टची चर्चा त्यांच्या समर्थकांसह राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे . काय आहे ही पोस्ट !!



ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे व त्यांच्या सुविध्य पत्नी डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या लग्नाचा वाढदिवस ! लग्नाचा वाढदिवस कोणाला आठवणार नाही व आनंद होणार नाही . 



            डॉ.  उषाताई तनपुरे अर्थात सहकार नेते राजारामबापू पाटील यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांच्या भगिनी . त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्त तनपुरे यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे . ती अशी



आई-बाबा,

तुमच्या सहजीवनाच्या प्रवासाकडे पाहिलं की नेहमी एक गोष्ट जाणवते नातं किती मोठं असतं हे शब्दांनी नाही, तर आयुष्यभर एकमेकांना दिलेल्या साथीतून कळतं.



लहानपणापासून तुमच्याकडून खूप काही शिकलो. माणसं जपणं, संकटात खंबीरपणे उभं राहणं, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणं आणि कितीही मोठं झालो तरी जमिनीशी जोडलेलं राहणं हे तुमच्याकडून मिळालेले संस्कार आयुष्यभराची ताकद आहेत.


आज तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मनापासून एवढंच सांगावंसं वाटतं की, तुमचा मुलगा म्हणून मिळालेली ओळख हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्ही दिलेले संस्कार, संघर्षातून लढण्याची ताकद आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द हीच माझी खरी संपत्ती आहे.

तुमचं प्रेम, आशीर्वाद आणि साथ अशीच कायम राहू दे. ईश्वर तुम्हाला निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य देवो!.


#happyanniversary❤️

सध्या या सोशल मीडियावरील भावनिक पोस्टची चर्चा सुरू आहे .

Post a Comment

0 Comments