मूंबईच्या बैठकीत नगर जिल्ह्यातील भाजपा नेते सहभागी ; विधान परिषदेचं भाजपच पक्क ठरलंय पण काय !!
सतर्क ( विशेष वृत्त )
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजितपालकमंत्री विखे पाटील व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची बैठकीस उपस्थिती !
📍रॉयलस्टोन, मुंबई | २८ मे २०२६
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी निवडणूक रणनिती, संघटनात्मक तयारी तसेच जिल्हा स्तरापर्यंतची समन्वय यंत्रणा अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष मा.आ. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांना स्पष्ट दिशा देण्यात आली असून, आगामी निवडणुकीसाठी सर्व स्तरांवर एकजुटीने आणि पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक बळकट करून विजयाचा मार्ग अधिक स्पष्ट करण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली .





Post a Comment
0 Comments