बनावट डिग्री व डॉक्टर शब्दाचा गैरवापर : राहुरी तालुक्यातील 'मुन्नाभाई' डॉक्टरवर गुन्हा दाखल ?
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी येथील एका निसर्ग उपचार केंद्रामध्ये कोणतीही अधिकृत वैद्यकीय नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी एका वैद्यकाच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन किंवा नॅशनल कौन्सिलकडे नोंदणी प्रमाणपत्र नसतानाही त्या वैद्यकाने उपचार केल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान संबंधित वैद्यकाने विविध चिकित्सा पद्धतींचा वापर करून रुग्णांच्या हिताला बाधक ठरतील असे औषधोपचार दिल्याचे निष्पन्न झाले. तसेच मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्टनुसार रुग्ण तपासणी व उपचार करण्याचा अधिकार नसतानाही वैद्यकीय सेवा दिल्याचे समोर आले आहे असेही समजले आहे .
याशिवाय ‘डॉक्टर’ शब्दाचा गैरवापर केल्याचे तसेच बनावट पदवीची कागदपत्रे तयार करून सादर केल्याचेही तपासात उघड झाले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मिसाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे असेही समोर आले आहे .
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे पुढील तपास सुरू असून या कारवाईमुळे राहुरी तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संबंधित वैद्यकाकडे उपचारासाठी येणारे अनेक रुग्णही या प्रकारामुळे चक्रावून गेले असल्याची चर्चा सुरू आहे.


Post a Comment
0 Comments