Type Here to Get Search Results !

प्रसिद्ध नाकोडा दुकान पहाटेच्या आगीत जळून खाक... पहा कोठे ते

प्रसिद्ध नाकोडा दुकान पहाटेच्या आगीत जळून खाक... पहा कोठे ते 



राहुरी  ( प्रतिनिधी )

राहुरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शिवाजी चौकातील नाकोडा स्वीट्स

या मिठाईच्या दुकानाला आज पहाटे मोठी आग लागून दुकानातील मिठाई व अन्य साहित्य जळून खाक झाले .

 पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे . गोपाल सिंग पुरोहित यांचे हे नाकोडा स्वीट्स मिठाईचे दुकान असून पहाटे दुकानातील डी फ्रीज ला शॉर्टसर्किट मुळे आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे .

 दुकानाला आग लागल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना समजताच राजपुरोहित यांना संपर्क करण्यात आला . तसेच राहुरी नगरपालिकेच्या अग्निशमक पथकालाही पाचारण करण्यात आले .

सुमारे एक तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली . मध्यवर्ती ठिकाणी आग लागून दुकान खाक झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे . राजपुरोहित यांचे दुकानातील मोठ्या लाखो रुपयांचे नुकसान झाले ची शक्यता आहे .

Post a Comment

0 Comments