अहिल्यानगर सराफ अमानुष मारहाण प्रकरण पद्मश्री अण्णासाहेब हजारें यांनी काय म्हटले पहा
सराफ मारहाण प्रकरणी दोषी पोलिसां वर कारवाई करावी ! पद्मश्री अण्णा हजारे
अहिल्यानगर ( विशेष वृत्त )
आहिल्या नगरच्या पोलिस अधिकाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन करून सराफ व्यावसायिकां वर अन्याय केल्यास कोणत्याही परिस्थितीत सहन करू नये, असे स्पष्ट करतानाच सराफाना पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाण प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पोलिसांची प्रतिमा मलीन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पोलिसांना दिला.
शेवगाव तालुक्यातील बोधेगावच्या सराफ व्यवसायिक भागवत आधापुरे यांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन अमानुष मारहाण करणाऱ्या कोतवाली पोलीस अधिकारी गणेश देशमुख व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी
या मागणीसाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 28 एप्रिल पासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
हे उपोषण आठ दिवस होत असून ही वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी दखल घेतली नाही. दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन निवेदन देत, या प्रकरणात लक्ष्य घालण्याची विनंती केली.
यावेळी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे संस्थापक काका साहेब बुऱ्हाडे , गणेश टाक, ओंकार गटगीळे, अक्षय शहाणे,भागवत आधापुरे, गजानन शहाणे, उपस्थित होते.
शिष्टमंडळाशी बोलताना हजारे म्हणाले की , संबंधित घटनेत सराफ बांधवां वर झालेला अन्याय अत्याचार , सराफ समितीच्या पदाधिकाऱ्यांना कस्टडीत झालेली मारहाण, सराफा कडून बेकायदेशीर होणाऱ्या रिकवरी, आणि पोलिसांची खाकी वर्दी मध्ये असणारे गुंडगिरी मुळे सर्व सामान्य जनतेत पोलिसांची विश्वासहर्ता कमी होईल. त्यासाठी वरिष्ठ पोलिसांनी यामध्ये लक्ष पोलिसांप्रती जनतेचा असलेला विश्वास कसा वाढेल तो व्यवस्थित कसा होईल. यासंदर्भात पोलिसांनी विचार करायला हवा. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे चौकशी करीत असल्याची माहिती आहे . . ते लवकरच पोलीस अधीक्षक यांना चौकशी अहवाल सुपूर्त करणार आहेत.






Post a Comment
0 Comments