Type Here to Get Search Results !

मातोश्रींच्या आशीर्वादानंतर थेट नगर गाठून तनपुरे यांनी केला विधान परिषद उमेदवारीचा अर्ज दाखल

 मातोश्रींच्या आशीर्वादानंतर थेट नगर गाठून तनपुरे यांनी केला विधान परिषद उमेदवारीचा अर्ज दाखल



 सतर्क - ( विशेष वृत्त )

        माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज अहिल्यानगर येथे विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला .


 

अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुरीत निवासस्थानी मातोश्री डॉ . उषाताई तनपुरे यांनी त्यांचे औक्षण केले . त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर थेट नगर गाठले .

        अहिल्यानगर येथे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते . डॉ . प्राजक्त तनपुरे यांच्या मातोश्री डॉक्टर उषाताई प्रसादराव तनपुरे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या भगिनी आहेत .प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे या सर्व घडामोडींना राजकीय महत्त्व प्राप्त झालेले आहे .

Post a Comment

0 Comments