मुळाधरणाचा पाणीसाठा १३ दिवसात एक टीएमसीने घटला : पाणी पातळीत पावणे दोन फुटांनी झाली घट - पावसाअभावी शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता
सतर्क - ( विशेष वृत्त )
नगर जिल्ह्याला जलसंजीवनी ठरलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा पावसाअभावी व दोन्ही कालवे सुरू असल्याने वाढण्याऐवजी ऑगस्टमध्ये घटत चालला आहे .
लाभक्षेत्रातील कालव्या अंतर्गत शेतीला लाभ होणार असला तरी पुढील काळात काय होणार ? याची चिंता कोरडवाहू क्षेत्रातील तीस हजार हेक्टर क्षेत्रातील शेतकरी वर्गात होत आहे .
यंदाच्या पावसाच्या प्रारंभी मुळा धरण मुळा धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक होता . एल निनो चा प्रभाव होणार असल्याच्या जोरदार सर्वंकष चर्चांमुळे पाण्याची चिंता वाढलेली होती . त्यातच जुलै महिन्यातील २२ दिवसांमध्ये मुळा धरणासह राज्यातील बहुतांश धरणांमध्ये ६० ते ९० टक्के पाणीसाठा वाढला . यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानाची वातावरण दिसून आले .
मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने पूर्णपणे ओढ दिल्याने सध्या दुष्काळाचे वातावरण दिसून येत आहे . मुळा धरणात २३ ऑगस्ट २०२६ रोजी २५ हजार २१६ दशलक्ष घनफूट इतका पाणी साठा होता . पावसाअभावी आवक थांबली , परंतु शेती सिंचनासाठी उजव्या कालव्यातून धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू झाले .
सध्या धरणाच्या उजवा कालव्यातून १६५० क्युसेकने तर डावा कालव्यातून २८५ क्युसेकने शेती सिंचनासाठी पाण्याची आवर्तन सोडण्यात आलेले आहे . या आवर्तनातून अंदाजे एक टीएमसी पर्यंत पाणी खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त होत असून मुळा धरणाची पाणी पातळी १२ ते १३ दिवसांमध्ये पावणेदोन फुटाने कमी झालेली आहे .
वास्तविक पाहता ऑगस्ट महिन्यामध्ये मुळा धरणासह सर्वच धरणांमध्ये पाण्याची आवक होत असल्याने धरण साठ्यात वाढ होते , मात्र बहुदा ही अनेक वर्षातील अशी दुर्मिळ वेळ आहे .धरण साठ्यात वाढ होण्याऐवजी साठा कमी होत असल्याचे चित्र आहे . राहुरी तालुक्यात सह धरणाच्या लाभक्षेत्रात राहुरी तालुक्यातील खरीपाचे व कोरडवाहू असे 30 ते 40 हजार हेक्टर क्षेत्र असून लाभक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यावर कालव्याचा लाभ नसलेले क्षेत्र आहे . त्यामुळे अशा क्षेत्रासह सर्वत्र सध्या चिंता व्यक्त केली जात असून पुढे काय होणार याकडे व धरणाच्या पाणी पातळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .



Post a Comment
0 Comments