Type Here to Get Search Results !

एस टी चे NCMC कार्डची इत्यंभूत माहिती ; शासनाने याबाबत सखोल खुलासा करावा महिला वर्गाची मागणी

एस टी चे  NCMC कार्डची इत्यंभूत माहिती ; शासनाने याबाबत सखोल खुलासा करावा महिला वर्गाची मागणी



    सतर्क -  ( विशेष वृत्त )

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने 



1 सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट देण्याचा दावा प्राथमिक पातळीवर तरी फोल ठरताना दिसत आहे.

या कार्डच्या रिचार्जच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाच भुर्दंड सोसावा लागत आहे. या कार्डच्या टॉपअपमध्ये (रिचार्जमध्ये) एजंटला देण्यात येणारा मर्चट डिस्काउंट रेट ग्राहकांच्याच खिशातून वसूल केला जात असल्याचं समोर आलं आहे. एजंटला देण्यात येणारा मर्चट डिस्काउंट रेटचा (एमडीआर) भार प्रवाशांवर पडतोय. टॉपअप करताना भरलेली संपूर्ण रक्कम कार्डमध्ये जमाच होत नाहीये. 'एनसीएमसी कार्ड नेमके कोणाच्या सुविधेसाठी?' असा प्रश्न आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.



एमडीआर म्हणजे काय?


एनसीएमसी कार्डसाठी सर्व्हिस प्रोव्हायडरची निविदा काढताना नेमण्यात येणाऱ्या एजंटला मर्चेंट डिस्काउंट रेट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. एमडीआर म्हणजे कार्ड किंवा डिजिटल पेमेंट व्यवहारासाठी व्यापारी अथवा सेवा संस्थेकडून बँक, पेमेंट नेटवर्क किंवा सेवा प्रदात्याला दिले जाणारे शुल्क.


मेट्रोलाही असं कार्ड पण तिथे सगळे पैसे येतात


मात्र, एमडीआरचा खर्च हा एसटी महामंडळ भरत नसून तो प्रवाशांकडून वसूल केला जात आहे. मात्र हा खर्च ग्राहकांनी का उचालायचा असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे मेट्रो सेवांमध्ये एनसीएमसी कार्डचा वापर व टॉपअप करताना अतिरिक्त शुल्क आकारले जात नाह. मग गावागावापर्यंत जाणाऱ्या आणि ग्रामीण भागातील कनेक्टीव्हिटीचा सर्वात सोयीस्कर पर्याय असलेल्या एसटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना हा अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड का सोसायचा असा सवालही उपस्थित केला जात आहे.

... तर मॅन्युअल तिकीटावर 14 सप्टेंबरपर्यंत सवलत


एनसीएमसी कार्ड प्रणालीच्या सर्व्हरवर ताण वाढला आहे. यामुळेच एनसीएमसी कार्ड रिचार्ज न होणे किंवा कार्ड रीड न होण्याच्या तक्रारी येत आहेत. तांत्रिक अडचणीमुळे सवलतीचे तिकीट कार्डमधून काढता न आल्यास 14 सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकिटावर सवलत देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नोंदणी आहे; मात्र कार्ड मिळालेले नाही, अशांना पावती दाखवून 30 सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकिटावर सवलत मिळेल असं जाहीर करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी तासन् तास रांगा लावूनही सर्व्हरच्या अडचणीमुळे कार्ड सक्रीय करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळेच मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आलेली. ही मागणी तात्पुरत्या स्वरुपात मान्य करण्यात आली आहे.


एजंटकडून रिचार्ज केल्यास किती फरक पडतो?


एजंटकडून 100 रुपयांचा टॉपअप केल्यानंतर प्रवाशांच्या कार्डमध्ये 86.14 रुपये बॅलन्स मिळतो. म्हणजेच 13.86 रुपये 100 रुपयामागे कापले जातात. हाच टॉपअप एसटीच्या वाहकाकडून केल्यास 98 रुपये बॅलन्स मिळतो. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वाहक हा एसटीचा कर्मचारी असल्याने एजंटप्रमाणे कमिशन द्यावे लागत नाही. मात्र, गेटवे चार्जेसच्या नावाखाली दोन रुपये प्रवाशांकडून आकारले जातात.

गावकऱ्यांनी रिचार्ज कसं करायचं?

एनसीएमसी कार्ड प्रणाली सुरू करण्यापूर्वी रिचार्जची यंत्रणा सुरळीत आहे की नाही, याची खातरजमा करणे आवश्यक होते. ग्रामीण भागात अनेक गावांपासून एसटी आगार 30 ते 35 किलोमीटरवर आहेत. अशा परिस्थितीत केवळ रिचार्जसाठी प्रवाशांनी तालुक्याच्या ठिकाणी जाणे शक्य नाही. त्यामुळे वाहकांकडे रिचार्जची सुविधा उपलब्ध करून द्यावी किंवा प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर रिचार्जची सोय करावी. जोपर्यंत रिचार्ज व्यवस्था सुरळीत होत नाही, तोपर्यंत सवलतीसाठी आधार कार्डचा पर्याय कायम ठेवावा, अशी मागणी गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाने केली आहे.


एसटी कर्मचाऱ्यांचाच आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंनी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींवरुन आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कर्मचारीच आंदोलनावर जातील अशा इशारा दिला आहे. "कोणतेही प्रशिक्षण न देता केवळ एका संदेशाद्वारे वाहकांना एनसीएमसी अंमलबजावणीच्या सूचना देणे अत्यंत चुकीचे आहे. दिवसभर कार्ड टॉपअप करताना एरर येणे, मशीन हँग होणे अशा तांत्रिक अडचणींमुळे वाहकांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे अंमलबजावणी पुढे ढकलून तोपर्यंत मशीनची सेटिंग पूर्ववत करणे आवश्यक आहे. अन्यथा संघटनेला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल," असं शिंदे म्हणालेत.

Post a Comment

0 Comments