Type Here to Get Search Results !

देवळाली येथील रहिवाशांच्या राहत्या जागेच्या प्रश्नासाठी नागरिकांची समन्वय समिती गठीत

देवळाली येथील रहिवाशांच्या राहत्या जागेच्या प्रश्नासाठी नागरिकांची समन्वय समिती गठीत



देवळाली प्रवरा ( प्रतिनिधी )

 देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. ७ प्रसादनगर मधील शिंगी प्लॉट येथील रहिवाश्यांचा प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांच्या पुढाकारणे शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.००

वाजता प्रसादनगर मधील मोहटा देवी मंदिरात शिंगी प्लॉट मधील नागरिकांची विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आली.


या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांच्यासह नगरसेवक प्रकाश संसारे, तेनूर भाई पठाण, गणेश भालके, भाऊसाहेब गायके, नंदू उल्हारे, निजामुद्दीन पठाण, चंद्रकांत कराळे, मुसा शेख, मुस्ताक शेख, जावेद शेख, सुभाष वाघ, सुनील बोरुडे, प्रदीप आंबेकर, बाळासाहेब मापारी, मिथुन शिंदे, अल्ताफ सय्यद, श्रीकांत थोरात, संजय थोरात, शशिकांत थोरात, सुनील डोळस, लक्ष्मण शिंदे, सोमनाथ चव्हाण, भाऊसाहेब गायकवाड, शकील शेख, हसन शेख, पोपट गोंडे, गंगाराम गोंडे, रंगनाथ गायके, शोभा खडके, मंदा लेभे, प्रमिला शिंदे, गोरीबिया पठाण, कविता पवार, कल्पना मोरे, तुलसी उदावंत, निलेश गायकवाड, सचिन उदावंत, किशोर पवार, अतुल वंजारे, मंगल जाधव, शिवाजी गोंडे, दिनेश कोकरे, हिराबाई जाधव, विशाल थोरात आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय -*

१. शिंगी प्लॉट मधील जागा नावावर करताना ज्यांची पक्की घरे आहेत त्यांना त्याच जागेवर ठेवण्याची दक्षता घ्यावी.

   २. पक्क्या घरांचा योग्य  

        मोबदला मिळावा.

३. घरांचे नुकसान टाळून जागेचा लेआउट तयार करावा.

४. जागा मालकाशी चर्चा करताना अवास्तव मागणी करू नये, यावर सर्वांचे एकमत झाले.


यावेळी बोलताना नगरसेवक प्रकाश संसारे व सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, सदर जागेबाबत निर्णय घेताना गोरगरिबांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल.


प्रसंगी जागा मालक व नगरपरिषद यांच्याशी चर्चा-विनिमय करून पुढील निर्णय घेण्यासाठी शिंगी प्लॉट समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.


*समन्वय समितीमध्ये -* सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस, नगरसेवक प्रकाश संसारे, नगरसेविका पल्लवी ढूस, तेनूर भाई पठाण, गणेश भालके, नंदू उल्हारे, दिनेश कोकरे, सुभाष वाघ, रावसाहेब लोंढे, संभाजी शिंदे, अतुल वंजारे, विशाल बर्डे, चंद्रकांत कराळे (निमंत्रित सदस्य), तुलसी उदावंत, कविता पवार, नीता गायकवाड, वंदना कांबळे, अफसाना सय्यद आदींचा समावेश करण्यात आला आहे.


बैठकीचे प्रास्ताविक आप्पासाहेब ढूस यांनी केले. चर्चेत नगरसेवक प्रकाश संसारे, तेनूर भाई पठाण, गणेश भालके, नंदू उल्हारे, दिनेश कोकरे, तुलसी उदावंत, कविता पवार यांनी आपले मत व्यक्त केले. तर आभार चंद्रकांत कराळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments