शिर्डीत महाराष्ट्र साई कलारत्न २०२७' चा पुरस्कार अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना जाहीर
शिर्डी ( प्रतिनिधी )
राहता तालुक्यातील पाथरे बु. या छोट्याशा खेड्या गावात राहणारे प्रमोद पंडित फिल्म क्षेत्रात आपली उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना महाराष्ट्र साई कलारत्न पुरस्कार चे अध्यक्ष सुदाम संसारे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे .
शिर्डीच्या पावन भूमीत राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र साई कलारत्न २०२७' या ऐतिहासिक व भव्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. ओम साई विकास प्रतिष्ठान व.बी. बी. सी फिल्म प्रोडक्शन, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्मितीत आणि संस्थापक अध्यक्ष सुदाम संसारे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा रविवार दि १० जानेवारी २०२७ रोजी सकाळी ९.३० परिवार लॉन्स, बँकेट हॉल, न्यू रिंग रोड सिटी मार्केट जवळ इंडियन पेट्रोलपंपाजवळ, शिर्डी येथे होणार आहे अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित यांचे अभिनय क्षेत्रात असलेले मोठे योगदान एक ग्रामीण भागातील कलाकार असलेला त्यांचे अनेक चित्रपट व मोठ्या कलाकारांसोबत त्यांचा कामाचा अनुभव त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना फिल्म क्षेत्रात कामाची संधी उपलब्ध करून दिली ग्रामीण भागात आपल्या ग्रामीण क्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे याआधी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या याच कामाची दखल घेत त्यांना हा महाराष्ट्र साई कलारत्न पुरस्कार २०२७ जाहीर झाला


Post a Comment
0 Comments