Type Here to Get Search Results !

आज अभियंता दिन : भारतात टेक्नोक्रसी कधी येणार ?

आज अभियंता दिन : भारतात टेक्नोक्रसी कधी येणार ?



सतर्क - विशेष वृत्त

*♦️भारतात अभियंते भरपूर होते आणि आहेत, तरीही आजपर्यंत टेक्नोक्रॅट/ अभियंते सत्तास्थानी आले नाहीत. ते कायम राजकीय नेते अथवा सनदी अधिकारी यांच्या सेवेत राहिले.

त्यामुळे राजकीय नेत्यांना आणि सनदी अधिकाऱ्यांना जेवढा मान मिळाला, तेवढा कर्तृत्ववान टेक्नोक्रॅटला कधीच मिळाला नाही*.

*प्रमुख सत्तास्थानी कधीच त्यांची नियुक्ती झाली नाही*. *अभियंत्यांची बुद्धी श्रेष्ठ असतानाही राजकीय नेते आणि सनदी अधिकाऱ्यांच्या अहंकारापुढे टेक्नोक्रसीची वाट अडवली गेली. म्हणूनच आरोप-प्रत्यारोप नेहमी तंत्रविशारदांच्या नशिबी आले.*

*♦️जगातील प्रगत देशांकडे पाहिले तर चित्र वेगळे दिसते. परदेशात अनेक ठिकाणी तंत्रविशारद (टेक्नोक्रॅट) हे अधिकार पदावर आहेत. सनदी अधिकाऱ्यांबरोबरच तंत्रविशारदांची संख्या सुद्धा मोठी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रोजेक्टचे नियोजन हे शास्त्रशुद्ध पद्धतीने होते*.

*♦️याउलट आपले धोरण हे तंत्रविशारदांची उपेक्षा करणारे असल्यामुळे मागील काही काळात धरणे फुटणे, रस्ते वाहून जाणे, ब्रीज कोसळणे यासारख्या घटना घडत आहेत. सार्वजनिक जीवनात तंत्रविशारदांची उपस्थिती अत्यल्प असल्यामुळे एखाद्या प्रकल्पाच्या निर्मितीवर भावना भडकवणारे युक्तीवाद होतात आणि अनेकदा विकासाच्या संधी वाया घालवल्या जातात.राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने निर्माण करण्यात येणार्या सार्वजनिक प्रकल्पांवर सामाजिक जीवनातील काम करणारे मान्यवर बोलू लागले तर राष्ट्र विकासाचे नुकसान संभवते*.

*♦️आज सिंचन क्षेत्रात "हायड्रोलिक्स् "या विषयावर असंख्य तज्ञांची गरज आहे. शेतकऱ्यांना सिंचन विभागावर अवलंबून राहावे लागते. सिंचन खाते अद्यापही राजकीय आणि सनदी पाशात गुरफटलेले आहे. म्हणून सरकारने आता तरी तंत्रविशारद / अभियंता यांना Infrastructure Development मध्ये महत्त्वाच्या स्थानावर संधी द्यावी, हीच अपेक्षा.*

(*चौकट मध्ये)♦️[भारतात डेमॉक्रसी आली आणि रुजली देखील. इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी आणलेली ब्युरोक्रसी देखील स्थिर झाली.मात्र डेमोक्रसीला समृद्धी आणण्यासाठी अत्यावश्यक असलेली "टेक्नोक्रसी"अद्यापही आपल्या देशामध्ये रुजलेली दिसत नाही याचा विचार करता "मेरीटोक्रसी" तर फारच दूर दिसते आहे.*]

*♦️आज देशाला टेक्नोक्रसीची गरज आहे आणि याचा विचार देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री नक्की करतील अशी अपेक्षा तंत्र विशारद ( टेक्नोक्रॅटस्) आणि अभियंत्यांना आहे. सद्यस्थितीत तशी पावले देखील उचलली जात असल्याची सुचिन्हे दिसून येत आहेत.*


*इंजि. हरिश्चंद्र(हरिश)र चकोर*

*जलसंपत्ती अभ्यासक तथा* 

*अभियंता ( सेवा निवृत्त) जलसंपदा विभाग* 

*संगमनेर, जि. अहिल्यानगर*

Post a Comment

0 Comments