Type Here to Get Search Results !

प्रेरणा मल्टीस्टेटने 100 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून अत्याधुनिक सुविधा आर्थिक शिस्तीमुळे प्रेरणा मल्टीस्टेटची सातत्याने प्रगतीकडे वाटचाल - संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे

 प्रेरणा मल्टीस्टेटने 100 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून अत्याधुनिक सुविधा आर्थिक शिस्तीमुळे प्रेरणा मल्टीस्टेटची सातत्याने प्रगतीकडे वाटचाल - संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे



राहुरी ( प्रतिनिधी )

गेल्या 14 वर्षांच्या काळात प्रेरणा मल्टीस्टेट संस्थेने काळानुरूप बदल केले असून अत्याधुनिक सुविधा, ठेविदार खातेदारांना संस्था देत आहे .



प्रेरणा मल्टीस्टेट ने 100 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून संस्थेतील आर्थिक शिस्तीमुळेच संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन प्रेरणा मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे यांनी केले .

 प्रेरणा मल्टीस्टेटच्या चौदाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते . सुरेश वाबळे म्हणाले की , प्रेरणा मल्टीस्टेटच्या आठ शाखा असून आगामी काळात गोव्यातील म्हापसा येथे लवकरच शाखा सुरू होणार आहे . तसेच नगर शहर , केसनंद (वाघोली ) आणि पुण्यातील भोसरी येथेही शाखा सुरू करण्याबाबत संस्थेच्या संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत . प्रेरणा मल्टीस्टेट यंदा अकरा टक्के लाभांश सभासदांना देणार आहे . 

 केंद्रीय सहकार मंत्री अमित भाई शहा यांनी सहकार मंत्री झाले नंतर सहकार कायदयातनवीन सुधारणा केल्या तसेच सहकार विभागात अनेक बदल घडवून आणल्याने अनेक संस्थांमध्ये कारभारात पारदर्शकता दिसून येत आहे . प्रेरणा मल्टीस्टेटच्या सर्व शाखांमध्ये लवकरच सभासदांना ऑनलाइन खात्यात पैसे देण्याची सुविधा सुरू करणार आहे . 

यावेळी झाली . अहिल्या नगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवाजीराव कपाळे यांचा सत्कार करण्यात आला . तसेच नगर जिल्हा सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी संजय वर्पे यांची जिल्हा बँकेच्या सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .तसेच राहुरी येथील डॉ . आप्पासाहेब दुस यांची आरोग्य विभागात वरिष्ठ पदावर पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .

अहवाल वाचन जनरल मॅनेजर अनिल वर्पे यांनी केले . यावेळी चेअरमन सुजित वाबळे. साई आदर्श मल्टी स्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे व संस्थेचे संचालक विष्णुपंत वर्पे , दादासाहेब उर्हेर,रविंद्र राऊत , राजेंद्र वर्पे , नंदकुमार दिघेसर, रावसाहेब शिंदे , अक्षय ओहळ. तर प्रेरणा पतसंस्था चे व्हा चेअरमन मच्छिद्र हुरुळे पा. अशोक उर्हे,श्रीकांत जगधने, दिलीप जगताप लक्ष्मण तांबे, नारायण जाधव नंदकुमार भराडीया रश्मित तरकसे जगन्नाथ वरखडे धनंजय दळे , संतोष खर्डे , उत्तमराव गाडे,सुरेश शिरसाठ सर , मदन गागरे सर, जगन्नाथ वर्पे व सर्व कर्मचारी वृंदआदी उपस्थित होते . संचालक प्रा.विशाल वाबळे यांनी स्वागत तर मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष प्रा . वेणूनाथ लांबे यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Post a Comment

0 Comments