देवळाली प्रवराच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा
देवळाली प्रवरा ( प्रतिनिधी )
श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी हिंदी दिनाचे औचित्य साधून मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यालयाच्या हिंदी विषय समितीचे अध्यक्ष श्री. शेख सर व हिंदी विषय समितीच्या सर्व सदस्यांनी केले होते.
विद्यालयाचे प्राचार्य श्री. रायते सर यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपप्राचार्या श्रीमती दिघे मॅडम, पर्यवेक्षक श्री. डोफे सर व श्री. साबळे सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शेख सर,श्री तातळे सर ,श्री धाडगे सर , कल्हापुरे सर दरेकर सर श्रीमती शेळके मॅडम श्रीमती शिंदे मॅडम श्रीम शेख मॅडम यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वच शिक्षक व विद्यार्थ्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हिंदी दिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



Post a Comment
0 Comments