Type Here to Get Search Results !

...... आणि आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी आमदार महोदयांना पाढे म्हणत मिळवले अनोखे बक्षिस

...... आणि आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी आमदार महोदयांना पाढे म्हणत मिळवले अनोखे बक्षिस



     राहुरी ( प्रतिनिधी )

           माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आणखी एक अनोख्या शैलीचे दर्शन घडवले .



          राहुरी शहरातील गाडगेबाबा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी पाढे पाठ करण्याचे आव्हान दिले होते. काल रात्री उशिरा आमदार श्री. प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली.



           मुलं आत्मविश्वासाने धडाधड पाढे म्हणून दाखवत होती. त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि चेहऱ्यावरील आनंद पाहून मन भरून आले.



[ 150 कोटींच्या ठेवींचा गौरवशाली टप्पा ]

 (  प्रेरणा पतसंस्था , गुहा . राहुरी . )

            आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिलेला शब्द त्यांनी लक्षात ठेवला आणि मेहनतीने तो पूर्ण करून दाखवला. त्यांच्या या छोट्याशा यशाचा आनंद आणखी मोठा व्हावा म्हणून आमदार श्री. प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून चप्पल भेट देण्यात आली. 


                     या निरागस चेहऱ्यांवरच उद्याचा समाज घडण्याची आशा आहे...! सदिच्छा व्यक्त केली . भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे आपल्या दैनंदिन कार्यामध्ये काही ना काहींनी वेगळी व अनोखी सामाजिक बांधिलकी म्हणून शैली दिसून येते . राहुरीतील गाडगे महाराज आश्रम शाळेतील मुलांसमोरचा संवाद हा पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात व नगर जिल्ह्यात चर्चेत आला आहे .

Post a Comment

0 Comments