अरे व्वा .... शिर्डी - नगर महामार्गावर येथे होणार भव्य पादचारी उड्डाणपूल - काम सुरू
📌राहुरी फॅक्टरी येथील पादचारी उड्डाण पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त.
📌 काम सुरु झाल्याने पालकांमध्ये आनंद.
📌आप्पासाहेब ढूस यांचेकडून आ. तनपुरे यांचे आभार...
राहुरी फॅक्टरी दि. 16 सप्टेंबर २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हद्दीत राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरील नगर मनमाड महामार्गावर शाळकरी मुलांसाठी जवळपास दीड कोटी रुपये खर्चाच्या लोखंडी पादचारी उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली झाल्याने पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून आप्पासाहेब ढूस यांनी आ. प्राजक्त दादा तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे..
राष्ट्रीय महामार्गचे अहिल्यानगरचे प्रोजेक्ट डायरेक्टर पी. बी. दिवान साहेब यांना दि. 19 जानेवारी 2021 रोजी देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी निवेदन देऊन डॉ बा बा तनपुरे सह साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नगर मनमाड महामार्गावर शाळकरी मुलांना रस्ता ओलांडण्यासाठी लोखंडी पादचारी पुलाची निर्मिती करण्याची मागणी करून सातत्याने सहा वर्ष पाठपुरावा केल्याने अखेर या कामाला गती मिळाली व पुलाचे काम सुरू झाले होते.
तथापि येथील काही विघ्न संतोषी मंडळींनी या पुलाचे काम हाणून पाडण्यासाठी वर पर्यंत प्रयत्न करून काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काही महिने या पुलाचे काम बंद पडले होते.. तथापि आप्पासाहेब ढूस यांनी विधान परिषद सदस्य आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या मदतीने या कामाला पुन्हा गती दिली व आज या पुलाच्या कामाला पुन्हा मुहूर्त मिळाल्याने काम सुरू झाले आहे. सदर काम सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आप्पासाहेब ढूस यांनी आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.



Post a Comment
0 Comments