६ तासांचा थरारक पाठलाग ! एक कोटींचा गुटखा जप्त- चित्रपटात शोभेल असा झाला पाठलाग
सतर्क - ( विशेष वृत्त )
१८ सप्टेंबरच्या दुपारी २ वाजता अन्न व औषध प्रशासनाला ( FDA ) टीप मिळाली . मध्य प्रदेशातून चाललेला गुटख्याचा ट्रक 'समृद्धी'वरून भिवंडीला नाही, तर चोरट्या मार्गाने संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने निघालाय .
राजगुरुनगर टोलनाक्यावर FDA अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी गाडी आडवी लावून ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला... पण सणकी चालकाने ट्रक थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर घेतला! अधिकाऱ्यांचा जीव वाचला पण...
यानंतर सुरू झाला ६ तासांचा हाय-व्होल्टेज . सावळे यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ट्रकचा पाठलाग सोडला नाही. अखेर रात्री ८ वाजता चाकण-तळेगाव चौकात सर्वांनी ट्रकला शिताफीने घेरले !
या कारवाईत विविध कंपन्यांचा सुगंधित पानमसाला, जर्दा आणि ट्रकला मिळून तब्बल १,१३,५४,६००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एवढ्यावर कारवाई इथेच थांबली नाही रात्रभर कागदपत्रांची पूर्तता करून १९ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजता चालक नफीस खान, पुरवठादार निलेश राठी, अरुण पाटील, संजय माटा आणि J.M.D. Enterprises वर BNS व FSS Act अंतर्गत चाकण उत्तर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
[ माध्यम तज्ञ नेत्वा धूरी वृत्त साभार ]
#TukaramMundhe #FDAMaharashtra #CrimeNews #Maharashtra #BreakingNews
📹 📸 अन्न व औषध प्रशासन.


Post a Comment
0 Comments