Type Here to Get Search Results !

राहुरीतील भगवा मित्र मंडळाने जपली पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून संस्कारांची पेरणी

 राहुरीतील भगवा मित्र मंडळाने जपली पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून संस्कारांची पेरणी


राहुरी ( प्रतिनिधी )

यंदा श्री भगवा मित्र मंडळाने गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण, संस्कारक्षम आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला आहे. “उत्सवातून भक्ती, भक्तीतून संस्कार आणि संस्कारातून समाजजागृती” या भावनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांची सुरुवात मंडळातील बाल स्वयंसेवकांनी अत्यंत उत्साहाने केली. पर्यावरणाचे संवर्धन आणि प्रदूषणमुक्त उत्सवाचा संदेश देत शाडूच्या मातीची गणेशमूर्ती, कागदापासून तयार केलेले आकर्षक डेकोरेशन तसेच ओला व सुका कचरा यांचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले.



या काळात पर्यावरणपूरक जीवनपद्धतीचा संदेश दिला असून

पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजमनात रुजावी, या उद्देशाने “पर्यावरणपूरक जीवनपद्धती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे व वक्ते यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि वृक्षवाटप करण्यात आले.

तसेच श्री. बुवासिद्ध देव तालीम संघातील संत रोहिदास महाराज सभागृहाची स्वच्छता करून स्वच्छता, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारीचा सुंदर संगम साधण्यात आला.यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी या कामाला कार्याला शुभेच्छा देत आपण मंडळाच्या व पर्यावरण विषयक बाबींच्या मागे आहोत असे सुचित केले .

Post a Comment

0 Comments