मातोश्री कै. तुळसाबाई सूर्यवंशी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व दंत तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
राहुरी प्रतिनिधी :
येथील श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेत श्री. जगन्नाथ सूर्यवंशी सर यांच्या मातोश्री कै. तुळसाबाई विठ्ठल सूर्यवंशी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राहुरी नगरपालिकेचे
लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. श्री. भाऊसाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक मा. श्री. सागरदादा कैलास तनपुरे होते. यावेळी नगरसेवक श्री. रविंद्र आहेर,नगरसेवक श्री. अरिफभाई शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे अंधजन मंडळाचे एस. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, हडपसर, पुणे संचालित नेत्र तपासणी केंद्र, राहुरी, दिव्यांग शक्ती सेवा संस्था, राहुरी तसेच राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली. शिबिरात आलेल्या नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून नेत्र व राम डेंटल क्लिनिक राहुरी यांच्या दंत तपासणी करण्यात आली. गरज असलेल्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. मधुकर घाडगे सर, तालुकाध्यक्ष श्री.योगेश लबडे, प्रहार संघटनेचे जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख, शहराध्यक्षजुबेर भाई मूसानी, रविभाऊ भूजाडी भरत आढाव दत्तात्रय खेमनर सुखदेव कीर्तने बाबा व कार्यकर्ते, श्री.मंगेश पगारे सर, तसेच सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्री. गजानन खर्चे सर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. श्री. गाडगे महाराज आश्रमशाळेचे श्री.सुदाम दिघे सर, श्रीमती मीनाक्षी लोखंडे(खर्चे)मॅडम, श्रीमती ज्योती चतारे(माळी)मॅडम तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि तपासणीसाठी आलेले असंख्य रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मधुकर घाडगे सर यांनी केले. यावेळी श्री. मंगेश पगारे सर तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक नगराध्यक्ष श्री. भाऊसाहेब मोरे सर यांनी श्री. जगन्नाथ सूर्यवंशी सर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमातून पुण्यस्मरणाला सामाजिक सेवेची जोड देत गरजू नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. दृष्टी आणि दंत आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन मिळाले, ही या शिबिराची विशेष बाब ठरली.
शेवटी श्री. जगन्नाथ विठ्ठल सूर्यवंशी सर यांनी शिबिरास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर, शिक्षक बंधू-भगिनी, एच व्ही देसाई रुग्णालयातील डॉ. अनिकेत घोलप सिद्धार्थ नेहे दंतरोग तज्ज्ञ डॉ. महेश इघे प्रहार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तपासणीसाठी आलेले रुग्ण आणि विशेषतः सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानून अभिनंदन केले.
पुण्यस्मरणातून समाजसेवेचा आदर्श
कै. तुळसाबाई विठ्ठल सूर्यवंशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरामुळे पुण्यस्मरणाला सामाजिक सेवेचे अर्थपूर्ण स्वरूप लाभले.



Post a Comment
0 Comments