राज्यातील प्रमुख 3,042 धरणांत सुमारे 67% इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध ; मराठवाड्याची स्थिती चिंताजनकच : विदर्भात जेमतेम स्थिती
अहिल्यानगर - सतर्क प्रतिनिधी :
राज्यातील सद्यस्थिती मध्ये जलसाठा करण्यात येत असलेल्या प्रमुख सुमारे ३०४२ मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये दि.१ नोव्हेंबर २०२६ रोजी सुमारे ६७.१३% टक्के म्हणजेच ९७२ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जल संपत्ती अभ्यासक व सिंचन विभागाचे से.नि. अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी आमचे प्रतिनिधी सोबत बोलताना दिली आहे .
पुढे बोलताना श्री चकोर म्हणाले की गतवर्षी(२०२५) याच दिवशी राज्यातील या प्रमुख धरणांमध्ये सुमारे ९०.२१% टक्के(१३०६.१८ टीएमसी) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता मात्र यावर्षी तो सुमारे २३.०८% टक्क्यांनी म्हणजेच(३३४.१८ टीएमसी )इतका कमी असल्याने
या वर्षी पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी व शेती सिंचनासाठी पाणी पुरविणे चे दृष्टीने निश्चितच चिंताजनक आहे.*
*राज्यातील प्रमुख सहा(६) महसुली विभागातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा खालील प्रमाणे*
*१) नागपूर(३८७ धरणे)---९९.२३० टीएमसी (५९.५४%)*
*२) अमरावती(२८३ धरणे)- ---७८.१४३ टीएमसी (५५.५५%)*
*३)छ.संभाजीनगर(मराठवाडा) ९३१ धरणे)------१०२.७३८ टीएमसी (३९.७७%)*
*४) नाशिक(५३९ धरणे) ----१५९.८७० टीएमसी (७६.०१%)*
*५) पुणे(७२८ धरणे) ----४२२.२२२ टीएमसी (७७.८१%)*
*६) कोकण(१७४ धरणे )---१०९.७९४ टीएमसी (८४.८७%)*
*♦️राज्यात सर्वात जास्त उपयुक्त पाणीसाठा हा कोकण विभागात ८४.८७%असून त्या खालोखाल पुणे विभागात ७७.८१% आहे. मात्र त्याचबरोबर सर्वात कमी पाणीसाठा मराठवाडा विभागात(३९.७७%) इतकाच असल्याने ही बाब नक्कीच चिंताजनक आहे*
♦️*त्याचबरोबर नागपूर आणि अमरावती विभागात देखील सरासरी ५७.५५% पर्यंतच उपयुक्त पाणीसाठा असल्याने यापुढील सुमारे दहा महिन्याच्या कालावधीसाठी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा लागणार आहे*
*♦️मात्र मराठवाडा व अहिल्यानगर जिल्ह्यासाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणातील आज 01 नोव्हेंबर 2026 रोजी रोजी एकूण पाणीसाठा हा ८१.५७ टीएमसी ( ७९.४०%) शिल्लक आहे .आतापर्यंत जायकवाडी धरणामध्ये सुमारे ६६.६३३ टी.एम.सी. इतकी नवीन पाणी आवक असून जायकवाडी धरण जवळपास शंभर टक्के भरलेले होते मात्र आतापर्यंत जायकवाडी धरणामधुन सुमारे ५.७९० टी.एम.सी. इतके पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे व तसेच खरीप हंगामात देखील शेती सिंचनासाठीव औद्योगिक वापर बिगर सिंचन वापर, बाष्पीभवन व्यय बऱ्यापैकी झालेला आहे. परंतु अजूनही जायकवाडी धरणात सुमारे ५५.५१० टीएमसी(७२.४०%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायदा- 2005 चे तरतुदी च्या आधीन राहून देखील जायकवाडी धरणात नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांतील धरण समूहांमधून पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याचे मत इंजि .चकोर यांनी व्यक्त केले*
*♦️सद्यस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रमुख १३ प्रकल्पांमध्ये सुमारे ३५.४१३ टी.एम.सी.(६०%) इतका एकूण पाणी साठा उपलब्ध झाला असून तो गतवर्षीपेक्षा(२९%) १६.०६ टी.एम.सी. इतका कमी आहे* .
*♦️विशेष म्हणजे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्प जवळपास ( भंडारदरा, निळवंडे, मुळा,आढळा) पूर्ण क्षमतेने भरलेले होते .दक्षिणेतील सीना, खैरी , मांडोहोळ,घाटशीळ पारगाव या प्रकल्पां मध्ये मात्र सरासरी सुमारें २६ टक्के इतकाच पाणीसाठा झालेला असल्याने ही चिंतेची बाब आहे*
*♦️महत्त्वाचे म्हणजे यावर्षी महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर येथे आजपर्यंत ४६३३ मिमी इतका पाऊस (मात्र गतवर्षीपेक्षा मीमी) झाला असून सर्वात कमी पाऊस अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे १५३ मि.मी. इतकाच नोंदवला गेलेला आहे.*
*♦️अहिल्यानगर जिल्ह्यातील आजचे धरण एकूण पाणी साठे खालीलप्रमाणे*
*१)भंडारदरा--- १०.३८९ टीएमसी (९४.११%)*
*२)निळवंडे ---५.२५८ टीएमसी (६३.०९%)*
*३)मुळा ---१६५४२ टीएमसी (६३.६२%)*
*४)आढळा---१.०२० टीएमसी (९६.२३%)*
*५)सीना----००.६७८ टीएमसी (२८.२५%)*
*६)खैरी----००.०७० टीएमसी (२०.०४%)*
*७)मांडोहोळ--००.०६६ टीएमसी (१६.६६%)*
*८)घाटशीळ पारगाव ---००.००० टीएमसी (००.००%)*
*९) विसापूर ---००.५८२ टीएमसी (६४.२८%)*
*१०) पिंपळगाव खांड---००.५०० टीएमसी (८३%)*
*♦️दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातील क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळवून देणार्या पुणे जिल्ह्यातील घोड धरणासह कुकडी प्रकल्प धरणसमुहांमध्ये देखील उत्तम पाणीसाठा(९०%) असल्याने निश्चितपणे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु पुढील दहा (१०) महिन्याचा कालावधीत पिण्याचे पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन रब्बी हंगामाचे पीक नियोजन( शेती सिंचन)*करावे लागणार आहे** *संगमनेर तालुक्यातील निमोण- तळेगाव दुष्काळी भागासाठी काही अंशी उपयुक्त असलेल्या भोजापूर धरणामध्ये देखील (९०%)पाणीसाठा उपलब्ध असून यावर्षी धरण तीन वेळा ओव्हर फ्लो झाले असून धरणातून अंदाजे ७८३ द.ल.घ.फु इतके पाणी कालव्याद्वारे ल.पा.तलाव, पाझर तलाव, गावतळे, दगडी व काँक्रीट बंधारे भरून देण्यासाठी सोडण्यात आलेले आहे*.*ही मोठी समाधानाची बाब दिसून येत आहे*परंतु जानेवारी नंतर दे मात्र पाणी टंचाई नक्कीच जाणवणार आहे*. *
*भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठका नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील ,मंत्री जलसंपदा, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या असून पिण्याचे पाणी व सिंचनासाठी लागणारे पाण्याचे उचित नियोजन केले असल्याचे समजते*
*♦️पुणे शहराला पाणी पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समूहांमध्ये यावर्षी ८०.९७% (२३.६१ टीएमसी) पाणीसाठा इतका उपलब्ध झालेला असल्याने पिण्याचे पाण्याचे संकट टळले असले तरी दहा महिन्याच्या कालावधी करता पाणी वापर जपून करणे आवश्यक राहणार आहे तसेच रब्बी व उन्हाळा हंगामातील पीक लागवडीचे देखील उपलब्ध पाण्यानुसार नियोजन करावे लागणार आहे.*.
*♦️नाशिक नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये यावर्षी सुमारे ९१.९६%(४१.४१८ टीएमसी )उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला असून गतवर्षीपेक्षा तो ७.१६% (३.६१७ टीएमसी)इतका कमी आहे .*
*तसेच जुलै /आगस्ट महिन्यात पडलेल्या उत्तम सरासरी पर्जन्यमानामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग गोदावरी नदी पात्रांमध्ये सोडावा लागलेला आहे *.*
*♦️नाशिक जिल्हा धरण समूहांमधून नांदूर मधमेश्वर बंधारा येथुन गोदावरी नदी पात्रात सुमारे ५८.१०८ टी.एम.सी. इतका पाणी विसर्ग जायकवाडी धरणाकडे सोडण्यात आलेला आहे.*
♦️*तसेच नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्यत्वे*गंगापूर धरणात--५.०९४ टीएमसी(९०.४८%)* *आणि*
*दारणा धरणामध्ये--६.८०९ टीएमसी (९५.२४%) इतका तसेच*
*कडवा --१.६३६ टीएमसी (९६.९२%)*
*भोजापुर --००.३२५ टीएमसी (९०%)उपयुक्त पाणीसाठा झालेला असल्याने सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही व तसेच सिंचन क्षेत्रासाठी देखील मोठा दिलासा मिळाला आहे*.*
*मात्र पुढील दहा महिन्याचा दुष्काळी कालावधी लक्षात घेता पिण्यासाठी पाणी राखून ठेवावे लागणार आहे. परिणामतः रब्बी हंगामात शेतीसिंचनासाठी पाणी सुद्धा जेमतेम उपलब्ध असणार आहे ,त्यामुळे शेतकऱ्यांना पीक लागवडीची काळजी घ्यावी लागणार आहे*
*♦️राज्यातील सर्वात मोठा जलसाठा असलेले उजनी धरण( एकूण --१००.१४ टीएमसी) ८५.४१%असुन त्या खालोखाल कोयना धरणामध्ये एकूण पाणीसाठा८८.०१० टीएमसी (८३.८१%) टक्के इतका उपलब्ध आहे.*
*♦️ यावर्षी राज्यात सर्वात जास्त पाऊस मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे ७३९२ मि.मी.इतका पडलेला आहे आणि सर्वात कमी पाऊस अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे १५३ मी.मी.इतकाच नोंदविण्यात आला आहे.*
*सद्यस्थितीत गिरणा धरण जवळपास(१८.३७० टीएमसी )१०० टक्के पाणीसाठा असून त्याचबरोबर हतनूर धरणामध्ये देखील ९.००५ टीएमसी (१००%,) पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे.*
♦️*सद्यस्थितीत विदर्भ, अमरावती व मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण असमाधानकारक असल्याचे दिसून येत असून आजमितीस विदर्भातील धरणांमधील पाणी साठ्याचे प्रमाण सरासरी ५७.५५% इतकेच आहे. ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. सद्यस्थितीत पेंच(१२.०९० टीएमसी (३३.६६%)व गोसीखुर्द धरणांमध्ये २६.१४० टीएमसी (१००)% इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध करून असल्याचे दिसून येत आहे*.
♦️*कोकण प्रदेशातील जवळपास सर्व धरणे भरली असून मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या (5) पाच ही धरणांमध्ये मध्ये आजमितीस १३.८०६ टीएमसी ( सुमारे ७७.६९%) टक्के पाणीसाठा झालेला आहे. व त्याचबरोबर ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावी धरणात देखील ११.३४० टीएमसी(९४.७५)% पाणीसाठा उपलब्ध असून नवी मुंबई आणि पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणात देखील महत्तम पाणीसाठा उपलब्ध झाला आहे*.
*सद्यस्थितीत यावर्षी अल् निनो प्रभाव दिसून येत असून राज्यात सरकारने ८० टक्के तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून ट्रिगर-वन लागू झाला असला तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात आर्थिक मदत किती मिळते याकडे लक्ष लागून आहे . तथापि राज्य सरकारने दिवाळीपूर्वी पाच(५) हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याची घोषणा केली असून सदरहु मदत ही अतिशय तुटपुंजी असून ती मदत नक्की कधी मिळणार याविषयी शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना पिकांचे सरसकट पंचनामे होऊन नुकसान भरपाई शासनाकडून मिळणे अपेक्षित असताना जाहीर केलेली ही तुटपुंजी मदत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे*
*महत्त्वाचे म्हणजे जलसंपदा विभागाने पुढील वर्षाच्या ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आल्याचे समजते*



Post a Comment
0 Comments