जिल्हा बँक निवडणुक - राहुरीत २ वाजेपर्यंत ७६ % मतदान : तनपुरे - कदम यांच्यात चूरस
राहुरी ( प्रतिनिधी )
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राहुरीत सौ . भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालयात मध्ये तीन मतदान केंद्रांमध्ये आज सकाळी वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली . मिळालेल्या माहितीनुसार राहुरीत सोसायटी मतदार संघातील 107 मतदारांपैकी 80 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला . शेतीपूरक मतदार संघात 34 पैकी 28 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर बिगर शेती मतदार संघातील 117 मतदारांपैकी 88 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .
दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असेल . राहुरीत प्राथमिक कृषी १०७ मतदार , शेतीपूरक ३४ मतदार तर बिगर शेती ११७ मतदार नूतन संचालकाला मतदान करतील . एकूण २५१ मतदार असतील .
राहुरी साठी विद्यमान भाजपाचे आमदार प्राजक्त तनपुरे तर त्यांच्या विरोधात देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष व भाजपाचे युवा नेता सत्यजित कदम यांच्यात जोरदार चूरस पहावयास मिळत आहे .
राहुरीतील सौ भागीरथीबाई तनपुरे विद्यालया समोर मतदान केंद्रासमोर मोठ्या प्रमाणात मतदार व समर्थकांची गर्दी दिसून येत होती .
उमेदवार सत्यजित कदम सकाळपासून या मतदान केंद्रावर स्थान मांडून असल्याचे दिसून येत होते .जिल्हा बँक प्रशासन व निवडणूक विभाग आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त होता .



Post a Comment
0 Comments