Type Here to Get Search Results !

अभिनेत्री सिद्धी गाडेकर ला सन्मान कलावंताचा पुरस्कार प्रदान

अभिनेत्री सिद्धी गाडेकर ला सन्मान कलावंताचा पुरस्कार प्रदान


 लोणी ( प्रतिनिधी )

(प्रतिनीधी) - कला ही केवळ मनोरंजनाची साधना नसते तर माणसाच्या मनाला स्पर्श करुन संस्काराची शिदोरी देणारी एक सुंदर उपासना असते.असेच आपल्या कलेतुन माणुसकीचा सुगंध दरवळत ठेवणार अहिल्यानगर



जिल्ह्यातील राहता तालुक्यातील सिनेअभिनेत्री सिद्धी गाडेकर ला नुकताच 'कलावंत विचार मंच नाशिक,कमल फिल्म प्रॉडक्शन व कमल म्युझिक मराठी' तर्फे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त दिला जाणारा या वर्षीचा "सन्मान कलावंतांचा" हा पुरस्कार पं.सा.नाट्यमंदिर शालीमार नाशिक येथे सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.

  अष्टपैलू सिद्धीचे अनेक नाटके,व ,वेबसिरीज,म्युझीक अल्बम,लघुपट तसेच मराठी व हिंदी चित्रपटात त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकेसह लेखन,गायन अशा भरीव कामगिरीची दखल घेऊन नाशिक येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व गझलकार डॉ.जयश्री वाध प्रसिद्ध व्याख्याते,कवी,पत्रकार श्री.संजय आहेर,सुप्रसिद्ध कवी मुकूंद ताकटे,प्रा.सोमनाथ मुठाळ,अभिनेत्री शिल्पा शाहीर व कमल फिल्म प्रॉडक्शन चे संचालक श्री.सुनिल मोंढे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते सृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन अभिनेत्री सिद्धी गाडेकर ला.सन्मानीत करण्यात आले.

      आपण केलेल्या कामाची दखल घेऊन रसिकांच्या प्रेमाची पावती जेव्हा मिळते तेव्हा उर भरुन येतं.अशी प्रतिक्रिया यावेळी अभिनेत्री सिद्धी गाडेकर ने व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.महाराष्ट्भरातून असंख्य कलाकार कार्यक्रमासाठी उपस्थित होते.याचवेळी नवीन मराठी चित्रपट "फडरंग" चे पोष्टर अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

    या वर्षातील मानाच्या तब्बल तीन सिने पुरस्कारांवर आपले नाव कोरणाऱ्या अभिनेत्री सिद्धी गाडेकर ला या गौरवाबद्दल, दादासाहेब फाळके चित्रपट युनियन जिल्हा अध्यक्ष प्रमोद पंडित, राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा,अध्यक्ष रूपाली भालेराव उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे,व समाजातील विविध स्तरातुन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments