🚨 ब्रेकिंग न्यूज : सोशल मीडियाच्या माध्यमातून टक्कल गायब करण्याचा दावा करणाऱ्या ५० लाखांच्या 'फेक' हेअर ऑईलवर एफडीएचा छापा ! ⚠️
एफ डी आय - सतर्क - ( विशेष वृत्त )
सोशल मीडियावर टक्कल पडलेल्यांना काही दिवसांतच केस उगवून देण्याचे भ्रामक दावे करणाऱ्या 'व्ही. एस. हेअर ग्रोथ ऑईल'वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिकमध्ये मोठी धडक कारवाई केली आहे .
इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरून आकर्षक जाहिराती करून विकल्या जाणाऱ्या या उत्पादनाचा तब्बल ₹ ५० लाख ३५ हजार किमतीचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला असून, या उत्पादनावर उत्पादकाचे नाव, पत्ता आणि अधिकृत परवाना क्रमांकच नमूद नसल्याचे समोर आले आहे.
⚠️ एफडीएचे आवाहन : फसव्या जाहिरातींपासून सावध राहा !
टक्कल घालवणे किंवा वजन कमी करण्याचे दावे करणाऱ्या सोशल मीडियावरील भ्रामक जाहिरातींना नागरिकांनी अजिबात बळी पडू नये. कोणतेही कॉस्मेटिक किंवा औषध खरेदी करताना त्यावर उत्पादकाचा पत्ता आणि परवाना क्रमांक असल्याची खात्री नक्की करा, अन्यथा आरोग्याशी खेळ होऊ शकतो. अशी कोणतीही संशयास्पद विक्री किंवा जाहिरात आढळल्यास तात्काळ FDA च्या १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा..
#FDA #NashikNews #HairGrowthOilFraud #ConsumerAwareness #TukaramMundhe
📷 अन्न व औषध प्रशासन







Post a Comment
0 Comments