Type Here to Get Search Results !

राहुरी स्टेट बँक शाखा - स्वामी विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद

 राहुरी स्टेट बँक शाखा - स्वामी विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद



राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या राहुरी शाखेमध्ये डॉ . तनपुरे कारखाना संचलित स्वामी विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद महाविद्यालय यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले .



राहुरी बाजार समितीलगत स्टेट बँक ऑफ इंडिया राहुरी शाखेत झालेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात रक्तगट तपासणी , नाडी गती तपासणी, सामान्य शारीरिक तपासणी, साखर तपासणी , डोळ्यांची व कानाची मूलभूत तपासणी, संधिवात व अन्य प्रकारच्या तपासण्या विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद महाविद्यालयाचे तज्ञ डॉक्टर व तज्ञ स्टाफ यांनी केल्या . स्टेट बँकेच्या ग्राहक ठेवीदारांसह नागरिकांचा या तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला .

 यावेळी शिबिराचे आयोजक स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी सुनील पवार , अंजूम पठाण , रवि शंकर बिलोरे , अतुल बंगाळ , वंदना वाघ , अन्य अधिकारी स्टाफ तसेच आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ . अपर्णा खपके , डॉ . ऋतिका सुरतकर , डॉ . आकाश हजारे , डॉ . तेजस माखाडे , डॉ . ऋषिकेश यदमाळ , ब्रदर बापू बलमे उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments