राहुरीचा पारा 10 अंशाच्या खाली परिसर पुरता गारठला
9.3° झाली नोंद !!
राहुरी ( प्रतिनिधी )
सलग दोन दिवसांपासून राहुरी परिसर पुरता गारठून गेला असून अलीकडच्या काळातील नीचांकी 9.3 इतक्या तापमानाचा नीचांकी नोंद झाला असून नागरिकांसह पशुपक्षी शेती पिकांना देखील हुडहुडी भरल्याचे चित्र आहे .
राहुरीच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा च्या अग्रोनोमी विभागा च्या प्राप्त माहितीनुसार बुधवारी 27 नोव्हेंबरला कमाल 27.8 इतके नीचांकी तर किमान 9.3 इतकी नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे . अलीकडच्या काळात हे सर्वाधिक कमी तापमान नोंद झाली आहे .
गेल्या दोन दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागातील वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झाल्याने सर्दी , खोकला , कफ अशा आजारांना निमंत्रण मिळत आहे . सध्या रब्बीच्या गव्हाचा मौसम असल्याने थंडीचा त्याला फायदा होऊ शकतो . मात्र मोठ्या प्रमाणात गारठा पसरल्याने दैनंदिन जनजीवनावर मात्र त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे . असेच तापमान आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे .

Post a Comment
0 Comments