पराभवाला न खचता माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नव्या उमेदीनं बोलवला आभार मेळावा ; मेळाव्याकडे सर्वांचे लागले लक्ष
राहुरी ( प्रतिनिधी )
गेली पाच वर्ष विविध विकासकामांनी राहुरी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे व सध्याच्या परिस्थितीत पराभवाला सामोरे गेलेल्या माजीमंत्री प्राजक्त तनपुरे तात्काळ सावरत पुन्हा एकदा जोमाने सोबत राहिलेल्या सावलीसारख्या लोकांसाठी सज्ज झाले आहेत .
उद्या शुक्रवारी राहुरीत महाविकास आघाडी , राष्ट्रवादी पक्ष , स्थानिक संघटन व समर्थकांसाठी सोबत राहिलेल्या सावलीसारख्या लोकांसाठी समर्थकांचा आभार मेळावा आयोजित केला आहे . या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
विधानसभा निवडणुकीत राज्यातील सद्य परिस्थितीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला व महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिला . राहुरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले . मात्र दोनच दिवसात पराभवाला न खचता प्राजक्त तनपुरे यांनी उद्या शुक्रवारी दिनांक 29 रोजी राहुरीत आभार मेळावा आयोजित केला आहे . या निवडणुकीत तनपुरे यांना एकूण मतदानाच्या 43% मतं मिळाली आहेत .
उद्या होणाऱ्या आभार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियावर दिलेल्या पोस्टमध्ये उद्याच्या मेळाव्याचे आवाहन करीत म्हटले आहे की ,
आपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एका कठीण परिस्थितीतून जात असताना आपले प्रेरणास्थान आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी पुन्हा एकदा प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला . द्वेषाचे राजकारण पसरवणाऱ्या शक्तींच्या विरोधात महाराष्ट्र धर्म राखण्याचा लढा स्वीकारला . सत्य, न्याय आणि विकास ही तत्वे अंगीकारत त्यांच्या सोबत आम्ही उभे राहिलो. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब आणि पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो . महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे योगदान अमूल्य आहे .
एका बाजूने साम, दाम, दंड, भेद सर्वच गोष्टींचा वापर होत असताना माझी लोकं सावलीसारखी माझ्या सोबत राहिली. विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल हा अनाकलनीय आहे. तो विवेक बुद्धीला पटणारा नाही. पण माझी लोकं माझ्या सोबत आहेत याचे समाधान वाटते .
आपल्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानण्यासाठी उद्या दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता व्यंकटेश मंगल कार्यालय, राहुरी येथे आपणास भेटतो आहे .
नक्की या!
माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या आवाहनानंतर राहुरीतील व्यंकटेश लॉन्स येथे दुपारी चार वाजता होणाऱ्या उद्याच्या आभार मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .



Post a Comment
0 Comments