नगर जिल्ह्यातील या नेत्याचे नाव मंत्री पदासाठी निश्चित
नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी या आमदारांना शपथविधीसाठी भाजपकडून फोन
सतर्क खबरबात - ( विशेष वृत्त )
मंत्रि पदासाठी नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागणार असल्याने विखे समर्थक व भाजप समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जोरदार चर्चा असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता नवोदित मंत्र्यांची नावे समोर आली आहे .आज रविवारी दुपारी नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे . भाजपाकडून प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून 19 आमदारांना शपथविधीसाठी फोन करण्यात आले . यामध्ये प्रामुख्याने भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील , शिवेंद्रराजे भोसले , गिरीश महाजन , पंकजाताई मुंडे , अतुल सावे , मंगल प्रभात लोढा , पंकज भोयर , दत्ता भरणे , गणेश नाईक , जयकुमार रावल यांना शपथविधीसाठी फोन करण्यात आल्याचे वृत्त आहे.
नगर जिल्ह्यातील भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील हे रात्रीच नागपूरकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे . राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागणार असल्याने विखे समर्थकांनी जल्लोषाचे वातावरण पहावयास मिळत आहे .


Post a Comment
0 Comments