Type Here to Get Search Results !

वांबोरी चे भूमिपुत्र धनंजय निमसे यांची निवड

 वांबोरी चे भूमिपुत्र धनंजय निमसे यांची निवड



राहुरी ( प्रतिनिधी )

वांबोरी येथील भूमिपुत्र व आयटी इंजिनीयर धनंजय संदीप निमसे यांची केंद्र सरकारच्या कर्मचारी चयन आयोगा मधून SSC CAPF ( मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स CISF ) पदी महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर निवड झाली .

 धनंजय निमसे यांच्या निवडीबद्दल त्यांचे वांबोरी सह राहुरी तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे .

निमसे यांनी कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण घेतले . धनंजय निमसे हे आयटी इंजिनिअर असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ मधील सेवानिवृत्त कर्मचारी साहेबराव निमसे व राहुरी खुर्द ग्रामपंचायतच्या माजी सदस्या सौ गयाबाई साहेबराव निमसे यांचे नातू आहेत . मुळा प्रवरा वीज संस्थेचे माजी कर्मचारी संदीप निमसे यांचे चिरंजीव आहेत . धनंजय निमसे यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे .

Post a Comment

0 Comments