Type Here to Get Search Results !

घरफोडी करणाऱ्या बंटी अन बबली जोडीस पोलिसांनी केले जेरबंद

घरफोडी करणाऱ्या बंटी अन बबली जोडीस राहुरी पोलिसांनी केले जेरबंद

 पोलीस कस्टडी दरम्यान राहुरी व यावल जिल्हा जळगाव येथून मुद्देमाल हस्तगत

राहुरी -  विशेष वृत्त



  याबाबत राहुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार   दिनांक 03/12/2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन गु र नं-1251/2024 बीएनएस कलम- 305(अ)331(3,6)प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्याबाबत गोपनीय बातमीदाराने सांकेतिक स्वरूपात (शेजारच्याच बंटी बबलीने चोरी केलेली आहे) अशी माहिती पोलीस निरीक्षक यांना खबऱ्या कडून मिळाल्याने ,



सदर गोपनीय माहितीच्या आधारे तर्क काढून संशयित इम्रान निसार शेख वय 30 व त्याची पत्नी.आयशा कासम शेख वय 31 रा.यावल, तालुका-यावल,जिल्हा जळगाव.. हल्ली रा- मुलंनमाथा ता.राहुरी यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपासात कसून चौकशी केली असता सदर आरोपींनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.त्यांना 4/12/2024 रोजी आटक करून मा. हुजूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली होती सदर पोलीस कस्टडी मिळविण्यामध्ये सरकारी अभियोक्ता श्री रविंद्र गागरे यांनी सरकारी पक्षाच्या बाजूने मांडली. रिमांड कालावधीमध्ये चोरीस गेलेला 64000/-रुपये किमतीचा सोने चांदीचे दागिने असलेला मुद्देमाल राहुरी व यावल जिल्हा जळगाव या ठिकाणांवरून हस्तगत करण्यात आलेला आहे. आज रोजी त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड संपल्याने मॅजेस्ट्रियल कस्टडी रिमांड मध्ये सदर आरोपींना घेण्यात आलेले आहे.नमूद गुन्हाचा तपास सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हे करीत आहेत.

       सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर,श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली , सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते,पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे , विजय नवले,पोलीस कॉन्स्टेबल जयदीप बडे,नदीम शेख, महिला पोलिस कॉन्स्टेबल वृषाली कुसळकर नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे. 


Post a Comment

0 Comments