Type Here to Get Search Results !

राहुरीत सकल हिंदू समाजाच्या वतीने महामोर्चा ; कर्डिले ,तनपुरे सहभागी होणार


राहुरीत सकल हिंदू समाजाच्या वतीने महामोर्चा ;  कर्डिले , तनपुरे सहभागी होणार


राहुरी - विशेष वृत्त

बांगलादेशातील हिंदू बांधवांच्या सद्यस्थितीत निषेधार्थ राहुरीत सकल हिंदू समाजाचा महामोर्चा उद्या 10 डिसेंबर सकाळी राहुरीत सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदू बांधवांच्या सद्यस्थितीतील निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुरी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .


या मोर्चाला विविध पक्ष संघटनांचा सहभाग असणार आहे . बांगलादेशात सध्याच्या स्थितीत हिंदू बांधवांना वरील जे अत्याचार अन्याय होत आहे , त्या विरोधात हिंदुस्थानातील देशभरात वेगळे वातावरण निर्माण झाले आहे .


या पार्श्वभूमीवर धर्म रक्षणासाठी व बांगलादेशातील हिंदू बांधवांना न्याय मिळण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने महाराष्ट्रात सर्वत्र उद्या दहा डिसेंबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .
राहुरीत उद्या दहा डिसेंबर रोजी सकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने महा मोर्चा चे आयोजन करण्यात आले असून यात सकल हिंदू समाजा सोबत विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सह माजी राज्यमंत्री व माजी आमदार प्राजक्त तनपुरे , युवा नेता हर्ष तनपुरे यांच्या समवेत अनेक संघटना यात सहभागी होणार आहेत .
उद्याच्या या सकल हिंदू समाजाच्या वतीने न्याय यात्रेकडे सर्वांचे लक्ष लागले असून या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाज च्या वतीने करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments