सोनार आपत्तीकालीन ग्रुपमधुन समाजकार्यात मदत- दहिवाळ महाराज
लोणी ( प्रतिनिधी )
एक मदतीचा हात सोनार आपत्तीकालीन ग्रुपमधुन जे गरजु समाजबांधव याना मदतीसाठी कार्य हे पवित्र कार्य आहे त्यामुळेच समाजातील गरजु समाजबांधव यांना एक मदतीचा हात ग्रुप समाजाला निश्चितच फायदा होईल असे महामंडलेश्वर मा.श्री.दत्तात्रय महाराज दहिवाळ म्हणाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महामंडलेश्वर मा.श्री.दत्तात्रय महाराज दहिवाळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण सोनार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, समाजाचे नेते मा.मधुकरराव मैड, संगमनेर येथील ज्येष्ठ समाजसेवक मा.दत्तात्रयशेठ मैड उपस्थित होते.
यावेळी मधुकरराव मैड म्हणाले कि एक मदतीचा हात ग्रुप चे रविभाऊ माळवे, सारिकाताई नागरे, बबनराव कुलथे दत्तात्रेय मैड या त्र्यिकुट यांच्या माध्यमातून समाजकार्यात निश्चितच मदत होईल त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे म्हणाले.
जेष्ठ समाजसेवक मा. दत्तात्रय मैड यांनी एक मदतीचा ग्रुप चे कैतुक करून शुभेच्छा दिल्या.
या वेळेस श्री.नरहरी टाक यांनी सर्व उपस्थित मान्यवर यांचे हस्ते मदतीचा चेक स्वीकारत सर्व समाजबांधव यांचे आभार मानले.
यावेळेस सर्व उपस्थित मान्यवर पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व दानशूर समाज बांधवांचे आभार मानले,
कार्यक्रमास मेजर शेवंतेसाहेब, उदयशेठ महाले,चिंन्तामणीसाहेब, विजयराव मैड,रविशेठ मैड, गुरुनाथ बोराडे, संदीप शेवंते, रविंद्र भास्कर माळवे, मिनाक्षीताई मैड, शामभाऊ गोसावी, श्रीपाद बोकन, सोमनाथ आहेर, शंकुतलाताई ,चिंन्तामणी साहेब सुनील उदावंत , सदानंद मैड, नित्यानंद मैड, तसेच समाजातील अनेक बंधुभगिनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मा.श्री.रविभाऊ माळवे यांनी केले.

Post a Comment
0 Comments