Type Here to Get Search Results !

शेतकऱ्याच्या मुलाची राज्य राखीव पोलीस दलात वर्णी

शेतकऱ्याच्या मुलाची राज्य राखीव पोलीस दलात वर्णी



म्हैसगाव, आग्रेवाडीचा शांताराम माने झाला पोलीस

ग्रामस्थांसह मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षांव

 म्हैसगाव -  ( विशेष वृत्त )

 इच्छाशक्ती दाखवत, जिद्द, चिकाटी, सातत्याच्या जोरावर प्रतिकुल परिस्थितीवर मात करत राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवत एका शेतकऱ्याचा मुलगा पोलीस झाला आहे. शांताराम सिताराम माने असे या पोलीस झालेल्या तरुणाचे नाव आहे.



     जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी असली की, कठीण परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालता येते. अशीच राहुरी तालुक्यातील म्हैसगाव (आग्रेवाडी) येथील शांताराम सिताराम माने याने अतिशय खडसर प्रयत्नातून राज्य राखीव पोलीस दलात नोकरी मिळविली आहे. 


      मुळा नदीच्या पायथ्याशी असलेल्या म्हैसगाव (आग्रेवाडी)मध्ये शांताराम याचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. आई-वडील शेती करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत संसाराचा गाडा हाकत आहे. शांताराम हा लहानपणापासून हुशार, जिद्दी, अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीचा तरुण होता. त्याच्या या जिद्दीमुळेच त्याने पोलीस पदाला गवसणी घातली आहे.


     शांतारामचे प्राथमिक शिक्षण आग्रेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण म्हैसगाव येथील श्री. केदारेश्वर माध्यमिक विद्यालयात झाले आहे. त्यानंतर त्याने पोलीस भरतीची तय्यारी करणे सुरू केले. अखेर खडतर प्रवासातून त्याने राज्य राखीव पोलीस दलात घवघवीत यश प्राप्त करुन पोलीस झाला आहे.


     शांतारामच्या यशाबद्दल आग्रेवाडी, म्हैसगाव ग्रामस्थांसह राहुरी तालुक्यातील विविध स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments