Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आमदार कर्डिलेंची भेट तब्येतीची केली विचारपूस

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आमदार कर्डिलेंची  भेट तब्येतीची केली विचारपूस 


सतर्क खबरबात टीम ( विशेष वृत्त )


राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले आजारी असल्याने लीलावती    रुग्णालयात  त्यांच्यावर  सध्या  उपचार  सुरू  आहेत .  या पार्श्वभूमीवर  सध्या  राहुरी  तालुका  व मतदारसंघातील  अनेक  काही  कार्यक्रमांमध्ये आमदार  कर्डिले  यांचे सुपुत्र  व भारतीय जनता पक्षाचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले दिसत आहेत . त्यामुळे आमदार शिवाजी कर्डिले हे आजारी असल्याच्या चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये सध्या सुरू आहेत .




           या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लीलावती रुग्णालयात आजारी असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांची भेट घेतली . काही काळ त्यांनी कर्डिले यांच्या समवेत बसून त्यांच्या तब्येतीची व उपचाराची चौकशी केली . 


सोशल मीडियावर याबाबतीत वायरल झालेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कर्डिले यांची भेट घेतल्यावर त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली व स्वतः काळजी घ्यावी , असे सांगितले . बरे होऊन तुमचे कुटुंब म्हणून असणाऱ्या जनतेला लवकर भेटावे . त्यांनाही तुमची गरज आहे , असे म्हटल्याचे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे . 

शुक्रवारी राहुरी सूतगिरणी जवळील दिंडोरी आध्यात्मिक केंद्राचे प्रमुख पूजनीय अण्णासाहेब मोरे यांच्या महा सत्संग मेळाव्यात आमदार कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांनी हजेरी लावली होती . यावेळी आमदार कर्डिले यांची अनुपस्थिती जाणवली व त्यांच्या समर्थकांमध्ये ते रुग्णालयात दाखल झाल्याची चर्चा सुरू झाली होती . या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कर्डिले यांच्या लीलावती रुग्णालयातील भेट घेत विचारपूस केलेले फोटो व्हायरल झाले आहेत .

Post a Comment

0 Comments