राहुरीच्या महासत्संग दरम्यान जबरी चोरी करणाऱ्या महिला राहुरी पोलिसांनी केल्या 24 तासाच्या आत अटक : आरोपी महिला बीड जिल्ह्यातील तीन तर नेवासातील एक
अटक केलेल्या महिलांना मा न्यायालयाने सुनावली चार दिवस पोलीस कस्टडी
राहुरी ( प्रतिनिधी )
दिनांक 31 1 2025 रोजी राहुरी फॅक्टरी येथे पूजनीय मोरे माऊली यांच्या महा सत्संग कार्यक्रमादरम्यान आलेल्या भाविक महिलांची जबरी चोरी करून लूट करण्याच्या घटना घडलेल्या होत्या.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे ,ज्योती डोके सहायक फौजदार तुळशीराम गीते, पोलीस हवालदार सुरज गायकवाड ,राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले , नदीम शेख , जालिंदर साखरे, वृषाली कुसळकर अशोक शिंदे, विकास साळवे, आजिनाथ पाखरे, जयदीप बडे यांच्या पथकाने बीड येथे रवाना होऊन महिला आरोपी यांना ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात आज दिनांक एक-दोन- 2025 रोजी अवघ्या 24 तासाच्या आत अटक करून मा. न्यायालयापुढे हजर करून सरकारी वकील. सविता गांधले उर्फ ठाणगे यांनी पोलिसांच्या वतीने बाजू मांडल्याने नमूद अटक आरोपी यांची मान्य न्यायालयाने चार दिवस पोलीस कस्टडी मंजूर केली आहे .
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार टी बी गीते करत आहेत.
राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने आव्हान करण्यात येते की सदर कार्यक्रमादरम्यान अजूनही कुणाची जबरी चोरी झालेली असल्यास त्यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी.




Post a Comment
0 Comments