Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत लाथ मारल्याच्या प्रकाराने नगरमध्ये गोंधळ

महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेत नगरमध्ये कुस्तीपटूने पंचाला लाथ मारल्याच्या प्रकारानंतर गोंधळ



सतर्क खबरबात टीम - अहिल्यानगर  ( विशेष वृत्त )



महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटू शिवराय राक्षेच्या पराभवानंतर पंचांच्या दिशेने लाथ मारल्याचा प्रकार आज अहिल्यानगर येथे सायंकाळी घडला .


              ( छायाचित्र  - सोशल मीडिया )

विशेष म्हणजे या अंतिम कुस्ती स्पर्धेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , मंत्री मुरलीधर मोहोळ , राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह हजारोंच्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते .


महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामना सायंकाळी अहिल्यानगर येथे पार पडला . 


         गादी विभागात पृथ्वीराज मोहोळ विरोधात कुस्तीपटू शिवराज राक्षे यांचा सामना चांगला रंगला . मात्र अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करतात पराभवानंतर कुस्तीपटू शिवराज राक्षे यांनी पंचांच्या दिशेने लाथ मारल्याचा प्रकार घडला . यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली .


             शिवराज राक्षे यांनी पंचांचा निर्णय चुकीचा असून आमच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली . माझी पाठ कुस्तीत टेकली नसल्याचेही त्याने यावेळी सांगितले . सायंकाळी उशिरापर्यंत पुढील निर्णय समजू शकला नाही .

मात्र सर्वत्र चर्चेत असलेल्या या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम  सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते . मात्र आजच्या या प्रकाराने अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मात्र गालबोट लागल्याची भावना कुस्तीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे .

Post a Comment

0 Comments