राहुरीत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन : 83 वर्षीय काकूंनी धरला कृष्णलीलेच्या तालावर ठेका
राहुरी ( प्रतिनिधी )
शहरात जोशी परिवाराच्या वतीने भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे सप्ताहामध्ये
प्रवचनादरम्यान कृष्णलीले वरील गीताच्या तालावर 83 वर्षीय ज्येष्ठ नागरिक देशपांडे काकून एका ठेका धरला होता . उपस्थित महिला भाविकांनी टाळ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला विजया सुधाकर देशपांडे काकू असे त्यांचे नाव आहे .
राहुरी येथील कै. पवन जोशी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जोशी परिवाराच्या वतीने श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून 14 तारखेपर्यंत भागवत कथेचा लाभ भाविकांनी घेण्याचे आवाहन जोशी परिवाराकडून करण्यात आले आहे .
राहुरी शहरातील कै. पवन जोशी यांच्या पुण्यस्मरण निमित्त बाजारपेठेतील जैन उपाश्रय हॉलमध्ये या श्रीमद् भागवत सप्ताह गिरीश सातभाई महाराज यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे.
भागवत कथेचे प्रारंभी भागवत कथेची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली . यावेळी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते . जैन उपास्राय हॉलमध्ये 14 फेब्रुवारी पर्यंत दुपारी दोन वाजता कथेचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन बंडू शेठ जोशी व जोशी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे .



Post a Comment
0 Comments