विघ्नहर कम्प्युटर टायपिंग राहुरीच्या विद्यार्थ्यांचा (MPSC) एमपीएससी लिपिक टंकलेखक परीक्षेत डंका
सतर्क खबरबात जिल्ह्याची - ( विशेष वृत्त )
नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी (MPSC)सहाय्यक (लिपिक टंकलेखक ) पदाच्या निकालात विघ्नहर कम्प्युटर टाइपिंग आणि स्किल टेस्ट सेंटरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली .
शासनाच्या विविध विभागात सहाय्यक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत राहुरी येथील विघ्नहर कम्प्युटर टायपिंग स्किल सेंटर मधील 50 विद्यार्थी मंत्रालय सहाय्यक महसूल सहाय्यक तसेच इतर पदासाठी पात्र ठरले यात श्री तन्मय काठोळे महाराष्ट्रात प्रथम क्रमांक. कुमारी डाळिंबी सरोदे हिने राज्यात मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. तर श्री प्रशांत कोकाटे महाराष्ट्रात तृतीय क्रमांक ने उत्तीर्ण झाले .
तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश संपादन केले.
कुठल्याही इन्स्टिट्यूट मधून एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे तसेच योग्य मार्गदर्शनाखाली नियमित सराव केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष डॉ.गौरव चोथे पाटील यांनी केले
या विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्राचार्य सौ प्रतिभा चोथे पाटील, प्रशिक्षिका कु.कोमल मुळे, प्रशिक्षक श्री.शशिकांत धनवटे ,प्रशिक्षक श्री.सौरभ फंड यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गौरव चोथे पाटील. संस्थेचे खजिनदार आप्पासाहेब चोथे पाटील. महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक श्री योगेशजी पाटील साहेब. अहमदनगर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री सुनील शिंदे साहेब, आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडिंग खेळाडू आप्पासाहेब ढुस.आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments