Type Here to Get Search Results !

हिंदू ग्रुप राहुरी च्या वतीने बलिदान मासानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच 17 तारखेला शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक

 हिंदू ग्रुप राहुरी च्या वतीने बलिदान मासानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच 17 तारखेला शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक 

राहुरी ( प्रतिनिधी )

 वर्ष 12 वे सालाबादप्रमाणे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सवानिमित्त व धर्मवीर बलिदान मास निमित्त हिंदु ग्रुप राहुरी तालुका यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 शनिवार दि: १५/०३/२०२५ रोजी १० ते ४ या वेळे मध्ये राहू केतू शनी मंदिर, शनि चाैक, राहुरी येथे होणार आहे. 


तुमच्या एका थेंब रक्ताने कोणाचा तरी जीव वाचू शकतो . आपले थोडेसे योगदान कोणासाठी तरी जीवनदान ठरू शकते. तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे , व  जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे , असे आवाहन  हिंदु ग्रुप राहुरी तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.


तसेच, सालाबादप्रमाणे याहीवर्षी १७ मार्च 2025 रोजी भव्यदिव्य शिवजयंती मिरवणूक आयोजित केलेली असून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे . प्रस्थान : ठीक ४:oo वाजता खरेदी विक्री संघ ते पूर्ण राहुरी शहर . आयोजक हिंदु ग्रुप राहुरी तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments