Type Here to Get Search Results !

... राहुरीत आणखी एका पाडकामाची चर्चा

 ... राहुरीत आणखी एका पाडकामाची चर्चा



राहुरी ( विशेष वृत्त )



       राहुरी शहरात सध्या महामार्गावरील तसेच शहरांतर्गत अनेक ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम वेगाने सुरू आहे . त्यातच एका पाडकामाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे .



 गेल्या सहा ते सात दशकांकून अधिक काळापासून प्रलंबित असलेल्या राहुरी पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे .


20 ते 25 वर्षांपासून राहुरी पोलीस स्टेशन लगतची पोलीस कर्मचारी वसाहत जीर्ण अवस्थेत व पूर्णपणे पडझड झालेली होती . या पोलीस वसाहतीत साधारणतः पाच चाळींमध्ये 40 ते 45 पोलिसांची निवासस्थानी होती . पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना ये - जा करण्यासाठी गोकुळ कॉलनी ,सौ भागीरथीबाई तनपुरे शाळेसमोर एक खुश्किचा मार्ग देखील होता . हा खुश्किचा मार्ग माहिती नाही असा पोलीस विभागाचा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही , असे गमतीने म्हटले जाते .


          दिवस-रात्र कायदा व सुव्यवस्थेसाठी राब राब राबणाऱ्या पोलीस दादांच्या घराचा मात्र प्रश्न मोठ्या कालखंडापासून जैसे थे होता राहुरीत बदलून आलेले अनेक पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना कुटुंबीयांसाठी बाहेरील गावाहून ये जा करावी लागते. तसेच सर्व परिसरात भाडोत्री रूम किंवा भाडोत्री फ्लॅट घेऊन राहावे लागते. अनेकांना आपल्या मुलांच्या शाळांचा देखील प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा लागते. 

अनेक जिल्हा पोलीस प्रमुख , उपविभागीय पोलीस अधिकारी , पोलीस निरीक्षक यांनी शासनाकडे तसेच पोलीस विभागाचे पोलीस महासंचालक कार्यालय कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवले होते . सदरचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत होते . मात्र आता या पोलीस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे . साधारणतः 935 स्क्वेअर मीटर्स मध्ये बहुमजली अशी पोलीस कर्मचारी वसाहत लवकरच होणार आहे .

नगरच्या ठेकेदार कंपनीला या इमारतीचा प्लॅन अर्थात आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले असून बुलढाणा ( मेहेकर ) येथील ठेकेदार कंपनीला इमारतीचे काम तयार करण्याचे कंत्राट दिल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली .

इमारत कशी होणार व ती कधी पूर्ण होणार याबाबत अधिक तपशील मात्र समजू शकला नाही . 

परंतु या जीर्ण व पडझड झालेल्या पोलीस कर्मचारी वसाहतीचे पाडकाम नुकतेच सुरू करण्यात आले आहे . या पोलीस कर्मचारी वसाहतीमध्ये काही पोलिसांचे कुटुंबीय राहत होते . मात्र त्यांनी अन्यत्र स्थलांतर केल्याने पोलीस कर्मचारी वसहतचे जुने बांधकाम पाडण्याचे काम सुरू झाल्याने आता राहुरी पोलिसांना नवीन पोलीस कर्मचारी वसाहत मिळण्याचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे . सध्या या पाड कामाची जोरदार चर्चा सुरू आहे .

Post a Comment

0 Comments