शेतकऱ्यावर हल्ला करून ठार मारणाऱ्या बिबट्याला 24 तासात जेरबंद करायला वनविभागाला यश
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी तालुक्यातील वडनेर येथील शोभाचंद गव्हाणे या शेतकऱ्यावर हल्ला करत ठार मारल्याची घटना सोमवारी पहाटे घडली होती . त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त झाला होता . माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही वनविभाग राज्य शासन व केंद्र सरकारवर कडक ताशेरे ओढले होते .
घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाचे उपवनसंरक्षक डी. डी साल विठ्ठल यांनी वनविभागाच्या वनरक्षक , वनपाल असा 30 ते 40 जणांचा ताफा वडनेर येथील गव्हाणे वस्तीसह विविध ठिकाणी पिंजरे लावून तैनात ठेवला होता . यावेळी स्थानिक ग्रामस्थांचीही साथ वनविभागाला होती . शेतकऱ्यावर हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते .
अखेर रात्रीच्या सुमारास नरभक्षक बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला . वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , पाच ते सहा वर्षांचा हा बिबट्या असून सध्या डिग्रस येथील नर्सरीत ठेवण्यात आला आहे . वरिष्ठांची चर्चा केल्यानंतर जुन्नर येथील बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात येईल .
दरम्यान , वडनेर सोसायटीचे किरण गव्हाणे यांनी वन विभागाकडे मागणी करत म्हटले की या पंचक्रोशीत आणखी पाच ते सहा बिबटे असून वन विभागाची बिबट्यांची शोध मोहीम अशीच सुरू ठेवावी .
उपवनसंरक्षक डी डी साल विठ्ठल , सहाय्यक वन संरक्षक गणेश मिसाळ यांच्या अधिपत्याखाली राहुरीचे वनक्षेत्रपाल पाचारणे , वनपाल रायकर , सचिन शहाणे , शेंडगे , खेमनर , गाडेकर , गिरी , घुगे , ससे , पठाण , गणदाट , शेळके , अमोलिक , मोरे आदींचा स्टाफ तैनात करण्यात आला होता . बिबट्या जेरबंद झाल्याने वडनेर कनगर आदी भागातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे .


Post a Comment
0 Comments