पुन्हा एकदा बिबट्याने घेतला शेतकऱ्याच्या नरडीचा घोट
सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त
राहुरी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून बिबट्याकडून मानवी वस्तीवर हल्ले सुरू असताना
आज भल्या पहाटे हृदय द्रावक अशी घटना वडनेर शिवारात घडली कांद्याला विहिरीवर पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने झडप घालून अक्षरशः फडशा पडल्याची घटना घडली आहे .
वडनेर तालुका राहुरी येथील शेतकरी शोभाचंद सिताराम गव्हाणे वय 48 हे आपल्या शेतातील कांद्यासाठी विहिरीवर पाणी घेत असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली व अक्षरशः फडश्या पाडला .
शोभाचंद गव्हाणे हे जागीच गतप्राण झाले.
दरम्यान आजूबाजूला ओरड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विहिरीजवळ धाव घेतली. बिबट्याने तिथून पळ काढलेला होता .
दरम्यान राहुरीतील ग्रामीण रुग्णालयात गव्हाणे यांना आणले असता घटनेची माहिती समजतात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वनविभागाचे सहाय्यक वनरक्षक गणेश मिसाळ व राज्य सरकार व केंद्र सरकारवर रोष व्यक्त केला .
यावेळी वडनेर गणेगाव कनगर मल्हारवाडी आदी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी वनविभागावर प्रचंड रोष व्यक्त करत नरभक्षक बिबट्याला तात्काळ मारण्याची ठार करण्याची मागणी केली


Post a Comment
0 Comments