Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर माजीमंत्री प्राजक्त तनपुरे पुन्हा आक्रमक : सोमवारी उतरणार रस्त्यावर

शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर माजीमंत्री प्राजक्त तनपुरे पुन्हा आक्रमक : सोमवारी उतरणार रस्त्यावर



राहुरी  प्रतिनिधी



शेतक-यांना दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा उपलब्ध करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरू केलेली आहे. 


या योजनेंतर्गत आरडगांव, ता. राहुरी येथे महावितरण कंपनीने सौर उर्जा प्रकल्पाचे काम पुर्ण केलेले आहे. हे काम पूर्ण होऊन प्रदीर्घ कालावधी झालेला आहे. परंतू अद्यापही हे सौर केंद्र कार्यान्वीत करण्यात आलेले नाही.

सदर प्रकल्प त्वरित सुरु करावा या मागणीसाठी माजी ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नेतृत्वाखाली दि. १७/०३/२०२५ रोजी राहुरी मांजरी नेवासा रस्त्यावर आरडगांव येथे करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे तालुकध्यक्ष मच्छिन्द्र सोनवणे आरडगावचे माजी सरपंच सुनील मोरे, शहराध्यक्ष संतोष आघाव, तालुका युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर बाचकर यांनी दिला.

सोनवणे मोरे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत देताना म्हणाले की शेतक-यांना दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा उपलब्ध करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत आरडगांव, ता. राहुरी येथे महावितरण कंपनीने सौर उर्जा प्रकल्पाचे काम पुर्ण केलेले आहे. हे काम पूर्ण होऊन प्रदीर्घ कालावधी झालेला आहे. परंतू अद्यापही हे सौर केंद्र कार्यान्वीत करण्यात आलेले नाही. परिणामी शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा करता येत नाही. सध्या तालुक्यात बिबट्यांचा संचार वाढलेला असल्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतीसाठी पाणी देण्यास घाबरत आहेत. त्यात सध्या उन्हाळा सुरु झाल्याने सर्वत्र विजेचा लपंडाव सुरु आहे.परिणामी त्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान होत आहे. या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक १७/०३/२०२५ रोजी सकाळी ठिक ८/३० वाजता राहुरी मांजरी रस्त्यावर आरडगांव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातर्फे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 

तालुकध्यक्ष मच्छिन्द्र सोनवणे म्हणाले राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर आमदार प्राजक्त तनपुरे यांची ऊर्जा राज्य मंत्री म्हणून निवड झाल्यावर त्यांनी राहुरी नगर पाथर्डी मतदार संघांसाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पतर्गत वांबोरी, आरडगाव, बाभुळगाव व पाथर्डी तालुक्यातील शिराळ ह्या ठिकाणी मंजूर केलेले प्रकल्प चे काम पूर्ण झाले. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येताच बाभुळगाव येथील प्रकल्पचे काम पूर्ण होऊनही अनेक महिने सदर प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने आमदार तनपुरे यांनी विधानसभेत आवाज उठवताच सदर प्रकल्प दुसऱ्या दिवशीच कार्यान्वित होऊन आज तेथील शेतकरी दिवसा शेतीसाठी पाणी भरत आहे.

वांबोरी येथील २ मेगा वैट च्या प्रकल्पचे काम पूर्ण होऊनही केवळ राजकीय हेतूने प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने प्रकल्प सुरु व्हावा यासाठी वांबोरी येथे रस्ता रोको करण्याचा इशारा देताच सदर प्रकल्प कार्यान्वित झाला त्या प्रकल्पवर ५६ ट्रान्सफार्मर चालत आहे. शेवटी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आंदोलनाचा इशारा देताच सुरु झाला. आता आरडगाव येथील ४ मेगा वेट क्षमतेचा प्रकल्पचे काम पूर्ण होऊनही सुरु न झाल्याने येत्या १७ तारखेला माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन सकाळी ८.३० करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला.

आरडगावचे माजी सरपंच सुनील मोरे म्हणाले माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आरडगाव सह परिसरातील गावांसाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी प्रकल्प मंजूर करताचा या प्रकल्पला आरडगाव ग्रामपंचायतीने २० एकर जागा दिली व त्यावर ४मेगा वेट चा २२ कोटी रुपये खर्चाचा निधी मंजूर करून आणला या प्रकल्पवर आरडगाव, मानोरी वळण, मांजरी, पिंपरी केंदळ खुर्द केंदळ बु, चंडकापूर, शिलेगाव, तांदुळवाडी आदि गावातील १७००/१८०० विद्युत पंप चालणार आहे आजही मुळा नदी काठावर बिबट्याचा संचार वाढला असून शेतकरी रात्री शेतीत पाणी भरण्यास जाण्यासाठी धजावत नसल्याने केवळ राजकीय श्रेय वादात अडकलेल्या या सौर कृषी वाहिनी तातडीने सुरु करावी याचे श्रेय कुणीही घ्या पण हा प्रकल्प एक दोन दिवसात सुरुकरावा अन्यथा माजी ऊर्जा राज्यमंत्री यांचे नेतृत्वाखाली येत्या १७ मार्च ला सकाळी ८.३० वाजता राहुरी नेवासा रस्त्यावर रस्ता रोको केला जाईल असा इशारा यावेळी दिला.

Post a Comment

0 Comments