Type Here to Get Search Results !

अखेर कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाची ठरली तारीख

अखेर कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाची ठरली तारीख


सतर्क खबरबात जिल्ह्याची  - विशेष वृत्त

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ पदवीदान समारंभाला अखेर मुहूर्त मिळाला असून पुढील महिन्यात मंगळवार दि. 22 एप्रिल 2025 रोजी पदवीदान समारंभ संपन्न होणार आहे .

       कृषी विद्यापीठाच्या वतीने माननीय राज्यपाल यांच्याकडे यासंदर्भात माहिती सादर झाल्यानंतर माननीय राज्यपाल यांच्या मान्यतेने कृषी विद्यापीठाचा 38 वा पदविधान समारंभ 22 एप्रिल 25 रोजी संपन्न होत आहे .

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये हजारो पदवी उत्तीर्ण झालेल्या स्नातकांना मान्यवरांच्या उपस्थितीत पदवी प्रदान केली जाते . हा पदवीदान सोहळा कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक अमृततुल्य असे पर्वणी असते .

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभ दर दोन वर्षांनी होतो , त्याला विशेष असे महत्त्व प्राप्त आहे . पदवीदान समारंभात महामहिम राज्यपाल महोदय , राज्याचे कृषिमंत्री , राज्यमंत्री , विद्यापीठाचे कुलगुरू , प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत पदवी उत्तीर्ण झालेल्या स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येते . यंदाच्या वर्षी कृषी विद्यापीठाचा 38 वा पदवीदान समारंभ 28 जानेवारी 2025 ला मोठ्या उत्साहात संपन्न होणार होता . हजारो पदवीधर स्नातकांचे लक्ष या सोहळ्याकडे लागून राहिलेले होते आणि तयारीही करण्यात येत होती . मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे हा पदवीदान समारंभ पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर निवेदन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नितीन दानवले यांनी केले होते . त्यामुळे ही अपरिहार्य अशी कारणे शोधली जात होती . त्यातच कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांचे दुखद निधन झाले . आता पदवीदान समारंभाची तारीख ठरली आहे .

 त्यानंतर नुकतेच विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. शरद गडाख यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या कुलगुरू म्हणून डॉ. गडाख हे विद्यापीठाचे काम पाहत आहेत. कृषी विद्यापीठाचा लौकिक जरी चांगला असला तरी अधिकारी स्तरावर तो घटल्याचे दिसत आहे. मागील वर्षी 'एनआयआरएफ'च्या २०२३ मधील मानांकन यादीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ३६ वा क्रमांक मिळाला होता. यंदाच्या मानांकनात कृषी विद्यापीठाचे नाव नसल्याने कृषी विद्यापीठ वर्तुळात तसेच शेतकरी राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सध्या झाली आहे . आता कृषी विद्यापीठातील दहा जिल्ह्यांतर्गत हजारो पदवीधर स्नातकांना 22 एप्रिल 2025 पर्यंत वाट पहावी लागणार आहे .

Post a Comment

0 Comments