राहुरीत शिवरायांच्या पुतळा विटंबनाप्रकरणी शिवप्रेमी संतप्त ; गुरुवारी (आठवडे बाजार ) राहुरी बंदची हाक
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरीत छत्रपती शिवरायांच्या पुतळा विटंबनाप्रकरणी झालेल्या शिवप्रेमींच्या संतप्त ; उद्या गुरुवारी (आठवडे बाजार ) राहुरी बंदची हाक दिली आहे .
राहुरीत बुधवारी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणी आज राहुरीत नगर मनमाड महामार्ग शिवप्रेमींनी तीन तास रोखला . पोलीस व प्रशासनाने यात दखल घेत संबंधित आरोपींना अटक करून कारवाई करण्याची आश्वासन दिले.
संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी दोन दिवसात संबंधित आरोपींना अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला .
दरम्यान , शिवरायांच्या पुतळा विटंबना प्रकरणी संशयित आरोपी अटकेसाठी उद्या गुरुवार आठवडे बाजाराच्या दिवशी राहुरी बंदचे आवाहन करण्यात आले आहे . यासंदर्भात राहुरी व्यापारी असोसिएशन ने जाहीर निवेदन केले आहे . तसेच राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर निवेदन प्रसिद्ध करत उद्या बाजार समितीतील मोंढा बंद राहणार असल्याचे निवेदन प्रसिद्ध केले आहे .
राहुरीतील शिवरायांच्या मूर्तीच्या विटंबने नंतर राहुरीसह जिल्ह्यात व अन्यत्र ठिकाणी शिवभक्तांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे .



Post a Comment
0 Comments