Type Here to Get Search Results !

जबरी चोरीतील आरोपी तब्बल दोन वर्षांनी अटक ; दोन दिवस पोलीस कस्टडी

जबरी चोरीतील आरोपी तब्बल दोन वर्षांनी अटक ; दोन दिवस पोलीस कस्टडी


राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी पोलीस स्टेशन 997/2023 भादवी 394 या गुन्ह्यातील दोन वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी शांताराम भानुदास काळकुंड वय 26 यास दिनांक 14 03 2025 रोजी सापळा रचून अटक केले आहे 


न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे .



याबाबत राहुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गोपनीय माहितीच्या आधारे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार विकास वैराळ, पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे, नदीम पठाण, सतीश कुऱ्हाडे यांच्या पथकाने अहिल्यानगर येथे सापळा रचून अटक केले व 



 

आज मान्य न्यायालयापुढे हजर ठेवले असता माननीय न्यायालयाने त्यास तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड सुनावली. 

सदर आरोपीचे रिमांड मिळणे कामे सरकारी अभियोक्ता श्री पर्बत साहेब यांनी सरकारी पक्षाच्या वतीने काम पाहिले. 

पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलवरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार वैराळ विकास करत आहे .


Post a Comment

0 Comments